Economics Nobel 2020 : पॉल मिल्ग्रोम आणि रॉबर्ट विल्सन यांना यंदाचे अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर

अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा हा पुरस्कार पॉल आर. मिल्ग्रोम आणि रॉबर्ट बी. विल्सन यांना घोषित करण्यात आला आहे.

Economics Nobel 2020 : पॉल मिल्ग्रोम आणि रॉबर्ट विल्सन यांना यंदाचे अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर
अक्षय चोरगे

|

Oct 12, 2020 | 5:20 PM

स्टॉकहोम : अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची (Nobel Prize) घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा हा पुरस्कार पॉल आर. मिल्ग्रोम (Paul R. Milgrom) आणि रॉबर्ट बी. विल्सन (Robert B. Wilson) यांना घोषित करण्यात आला आहे. लिलावाची तत्त्वे आणि लिलावाच्या नव्या प्रारुपाच्या शोधासाठी दिलेल्या योगदानाबद्दल मिल्ग्रोम आणि रॉबर्ट विल्सन यांची नोबेलासाठी निवड करण्यात आली आहे. (Economics Nobel 2020 goes to Paul R. Milgrom, Robert B. Wilson for their work on auction theory)

गेल्या वर्षी MIT आणि हॉर्वर्ड विद्यापीठातील संशोधकांना अर्थशास्त्रातील नोबेल देण्यात आले होते. त्यावेळी तब्बल 11 लाख अमेरीकन डॉलर्स इतकी रक्कम पुरस्कार स्वरुपात प्रदान करण्यात आली होती. त्यामध्ये भारतीय वंशाचे अभिजीत बॅनर्जी यांचा समावेश होता. तसेच अमर्त्य सेन यांना 1998 साली या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

दरम्यान, 2020 च्या वैद्यकीय विभागातील नोबेल पुरस्कार अमेरिकेचे हार्वे जे अल्टर, चार्ल्स एम राईस आणि ब्रिटिश संशोधक मायकल ह्यूटन यांना देण्यात आला आहे. या तिघांनाही कॅन्सर आणि सिरोसिसला कारणीभूत ठरणाऱ्या हेपेटायसिस सी (Hepatitis C) या विषाणूचा शोध लावण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला.

भौतिक शास्रातील नोबेल पुरस्कार यंदा 3 शास्रज्ञांना विभागून देण्यात आला आहे. भौतिकशास्रात केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आलंय. रॉजर पेनरोज , रेनहार्ड गेंजेल, एन्ड्रिया गेज या 3 शास्रज्ञांचा या पुरस्कारानं गौरव करण्यात आलाय. ब्लॅक होल फॉर्मेशनला भौतिकशास्राच्या जनरल थिअरी ऑफ रिलेटीविटीशी जोडण्याचं काम रॉजर पेनरोज यांनी केलं. तर रेनहार्ड आणि एन्ड्रिया या दोन्ही शास्रज्ञांनी आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी असलेल्या अतिविशाल ब्लॅकहोल शोधून काढला. त्यांचं हे काम अंतराळ संशोधनात अतिशय मोलाचं आहे. त्यामुळंच त्यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं

रसायनशास्त्रातील (केमिस्ट्री) यंदाचा नोबेल पुरस्कार दोन महिला वैज्ञानिकांना मिळाला आहे. इमानुएल शॉपोंतिये (फ्रान्स) आणि जेनिफर ए डुडना (अमेरिका) असं या संशोधकांचं नाव आहे. त्यांना ‘जीनोम एडिटिंग’ची एक पद्धत विकसित करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या शोधानंतर लाईफ सायन्स एका नव्या उंचीवर पोहचणार आहे. यामुळे संपूर्ण मानवतेला खूप मोठा फायदा होईल, असं मत नोबेल पुरस्कार समितीने व्यक्त केलं आहे.

अमेरिकेच्या कवयित्री लुईस ग्लक यांना यंदाचा साहित्यातील नोबेल पुरस्कार देण्यात आला. लुईस यांचा त्यांच्या असामान्य काव्यात्मक अभिव्यक्तीसाठी सन्मान करण्यात आला. लुईस येल विद्यापीठात इंग्रजीच्या प्राध्यापक आहेत. त्यांचा जन्म 1943 मध्ये न्यूयॉर्कमध्ये झाला होता. त्यांच्या कविता नेहमीच बाल्यावस्था, कौटुंबिक जीवन, आई-वडील आणि भाऊ-बहिण यांच्या परस्पर संबंधांवर केंद्रीत होतात, असं मत नोबेल पुरस्कार समितीने व्यक्त केलं आहे.

जागतिक स्तरावर अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या यंदाच्या शांततेच्या नोबेल पुरस्काराचा मानकरी ‘जागतिक अन्न कार्यक्रम’ म्हणजेच ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’ (WFP) ही संस्था ठरली आहे (World Food Programme got 2020 Nobel Peace Prize). “‘डब्ल्यूएफपी’ला जागतिक स्तरावरील भुकेचा प्रश्न सोडवणे, युद्धजन्य परिस्थितीत परिस्थिती सुधारण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आणि युद्ध आणि संघर्षासाठी होत असलेला भुकेचा दुरुपयोग रोखण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांसाठी या वर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात येत आहे,” अशी माहिती नोबेल पुरस्कार समितीने दिली.

नोबेल पुरस्कार काय आहे?

नोबेल पुरस्कार हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या सहा क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. स्वीडिश शास्त्रज्ञ आल्फ्रेड बर्नार्ड नोबेल यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली होती. 1901 सालापासून त्याची सुरुवात करण्यात आली. 1969 पासून आल्फ्रेड नोबेल याच्या स्मरणार्थ स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेने (रिक्स बँक) अर्थशास्त्रातील मौलिक कार्यासाठी सहावे नोबेल पारितोषिक देण्यास सुरुवात केली. पुरस्काराचं स्वरुप एक मेडल आणि 1 कोटी स्वीडिश क्रोना म्हणजेच जवळपास 8-9 कोटी रुपये मिळतात.

संबंधित बातम्या

Nobel Prize 2020 Photos: कुणाला, कोणता नोबेल पुरस्कार मिळाला, पुरस्कार्थींची संपूर्ण यादी

पेनरोज यांच्या नोबेलमध्ये भारतीय शास्त्रज्ञाचं मोठं योगदान, अमल कुमारांच्या अनोख्या समीकरणानं ब्‍लॅक होलचं गुपित उघड

(Economics Nobel 2020 goes to Paul R. Milgrom, Robert B. Wilson for their work on auction theory)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें