ऊसतोड कामगारांच्या गाडीला धुळ्यात भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू

मध्यप्रदेशातील ऊस तोडणी कामगारांच्या वाहनाला धुळ्यात भीषण अपघात झाला (Dhule accident sugar cane labor) आहे. या अपघातात 8 कामगारांचा मृत्यू झाला.

ऊसतोड कामगारांच्या गाडीला धुळ्यात भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू

धुळे : मध्यप्रदेशातील ऊस तोडणी कामगारांच्या वाहनाला धुळ्यात भीषण अपघात झाला (Dhule accident sugar cane labor) आहे. या अपघातात 8 कामगारांचा मृत्यू झाला. तर 24 जण गंभीर जखमी झाले (Dhule accident sugar cane labor) आहे. अपघातातील जखमींवर धुळे जिल्ह्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. हे सर्व कामगार उस्मानाबाद येथे ऊस तोडणीसाठी जात (Dhule accident sugar cane labor) होते.

मध्यप्रदेशातील ढवळ्या विहीर ठिकाणाहून हे मजुरांचे वाहन ऊस तोडणीसाठी उस्मानाबादकडे जाते होते. काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास या मजुरांच्या वाहनाला धुळे जिल्ह्यातील शिरुर गावाजवळील विंचूर फाट्यावर बोरी नदीच्या पुलावर अपघात झाला. या अपघातात पिकअप गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला. यात जवळपास आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत जवळपास 24 कामगार जखमी झाल्याची माहिती समोर आली (Dhule accident sugar cane labor) आहे.

हा अपघात रात्री झाल्याने उशिरापर्यंत बचावकार्य सुरु होते. किरकोळ आणि गंभीर जखमींना तात्काळ धुळे शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. या वाहनातील सर्वच मजूर मध्यप्रदेश येथून उस्मानाबाद येथे ऊस तोडणीसाठी जात होते. या अपघातात जवळपास 8 मजूरांचा मृत्यू झाला आहे. यात दोन लहान मुलांचाही समावेश आहे.

Published On - 9:24 am, Sat, 30 November 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI