LIVE : बॉम्बस्फोटानं श्रीलंका हादरली, जवळपास 200 जणांचा मृत्यू

LIVE : बॉम्बस्फोटानं श्रीलंका हादरली, जवळपास 200 जणांचा मृत्यू

कोलंबो : श्रीलंकेची राजधानी कोलंबो आणि इतर काही शहरात 6 ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट झाले आहेत. तीन चर्च आणि तीन फाईव्ह स्टार हॉटेलना हल्लेखोरांनी लक्ष्य केले आहे. ईस्टर संडेच्या दिवशीच ख्रिश्चन समाजाला लक्ष्य करत, चर्च आणि हॉटेलमध्ये स्फोट घडवून आणल्याने, मोठी जीवितहानी झाली आहे.

श्रीलंकेतील भारतीयांसाठी हेल्पलाईन नंबर

श्रीलंकेत पर्यटनासाठी गेलेल्या किंवा तिथे राहत असलेल्या भारतीयांना मदत हवी असल्यास, श्रीलंकेतील भारतीय दूतावासाने हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. +94777903082, +94112422788, +94112422789 या नंबरवर श्रीलंकेतील भारतीय नागरिक संपर्क करु शकतात.

UPDATE :

 • श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांमध्ये ३ भारतीय नागरिकांचा मृत्यू: परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची माहिती

Reuters quoting police: Death toll from Sri Lanka’s eight explosions rises to 207; 450 injured, seven people arrested pic.twitter.com/9FLwr4giAS

— ANI (@ANI) April 21, 2019

 • श्रीलंका पोलिसांकडून 7 संशंयिताना अटक
 • बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा वाढला, आतापर्यंत 207 जणांचा मृत्यू, तर 450 हून अधिक नागरिक जखमी
 • फेसबुकसह सर्वच सोशल मीडियावर बंदी, अफवा रोखण्यासाठी श्रीलंकन सरकारचा उपाय
 • श्रीलंकेत आणखी बॉम्बस्फोट, सकाळपासून तब्बल 8 साखळी बॉम्बस्फोट, जवळपास 200 जणांचा मृत्यू
 • श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटानंतर कर्फ्यू लागू, श्रीलंकेच्या संरक्षणमंत्र्यांची घोषणा
 • श्रीलंकेत ‘तौहिद जमाद’ने साखळी बॉम्बस्फोट केल्याचा संशय, या स्फोटात आतापर्यंत जवळपास 200 जणांचा मृत्यू
 • श्रीलंका बॉम्बस्फोट : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडून बॉम्बस्फोटाचा निषेध, तसेच राहुल यांच्याकडून मृतांना श्रद्धांजली आणि जखमींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना

 • श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटानंतर मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश, धार्मिक स्थळांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश
 • श्रीलंकेतील कोलंबोत आणखी एक बॉम्बस्फोट, पुन्हा एकदा फाईव्ह स्टार हॉटेल टार्गेट, दोघांचा मृत्यू
 • श्रीलंकेतल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर भारतातही हाय अलर्ट जारी, भारतातील सर्व विमानतळांवर अलर्ट
 • श्रीलंकेतल्या बॉम्बस्फोटात मृतांचा आकडा 185 वर, मृतांमध्ये 35 परदेशी नागरिकांचा समावेश
 • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटाचा निषेध, मोदींकडून मृतांना श्रद्धांजली, तर जखमींच्या प्रकृती सुधारणेसाठी प्रार्थना

 • आतापर्यंत 160 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये 9 परदेशी नागरिकांचा समावेश असल्याची स्थानिक पोलिसांची माहिती
 • श्रीलंकेतील भारताच्या दूतावासाकडून भारतीयांसाठी हेल्पलाईन नंबर जारी

 • बॉम्बस्फोटाने मोठा धक्का बसला आहे, हा हल्ला पूर्वनियोजित आणि तयारीनिशी केला गेलाय, श्रीलंकेचे राष्ट्रपती सिरिसेना यांची पहिली प्रतिक्रिया
 • कोलंबोत सैन्याला पाचारण, सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द
 • श्रीलंकेत भीषण साखळी बॉम्बस्फोट, आतापर्यंत 160 जणांचा मृत्यू

 • आतापर्यंत 100 जणांचा मृत्यू, तर 300 हून अधिक जण जखमी
 • श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा वाढला, मृतांची संख्या 52 वर

 • श्रीलंकेतील भारतीयांच्या मदतीसाठी भारतीय दूतावासाकडून संपर्क क्रमांक जाहीर

 • बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा 42 वर
 • कोलंबोतील भारतीय दूतावासाशी सातत्याने संपर्कात आहे, सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची ट्विटरवरुन माहिती

 • जखमींची संख्या वाढली, 280 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती
 • या बॉम्बस्फोटात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू, तर 180 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना कोलंबोतील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात येत आहे.

बॉम्बस्फोट कुठे कुठे झाले?

 • शांग्रिला फाईव्ह स्टार हॉटेल
 • सिनमन ग्रँड फाईव्ह स्टार हॉटेल
 • किंग्सबरी फाईव्ह स्टार हॉटेल
 • सेंट अँथनी चर्च (कोलंबो)
 • सेंट सेबस्टियन चर्च (नेगंबो)
 • बट्टिलकलोबा येथी चर्च

पोलिसांसह श्रीलंकेतील सर्व मुख्य सुरक्ष यंत्रणांनी घटनास्थळांकडे धाव घेतली असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि नागरिकांना आधार देण्याचा प्रयत्न केले जात आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI