पहिल्या प्रयत्नात 2 गुण कमी पडल्याने अपयशी, दुसऱ्या प्रयत्नात थेट देशात दुसरा

नवी दिल्ली : केंद्रीय लोक सेवा आयोगाने (UPSC) शुक्रवारी निकाल घोषित केला. यात दुसरा आलेल्या 23 वर्षीय अक्षत जैनच्या यशाची कहाणी अचंबित करणारी आहे. अक्षत पहिल्या प्रयत्नात 2 गुण कमी पडल्याने यूपीएससी परीक्षेत नापास झाला होता. मात्र, त्याने आपल्या अभ्यासाच्या जोरावर दुसऱ्या प्रयत्नात थेट देशात दुसरा येण्याचा मान मिळवला आहे. यूपीएससी परीक्षेमध्ये आलेल्या पहिल्या अपयशातून […]

पहिल्या प्रयत्नात 2 गुण कमी पडल्याने अपयशी, दुसऱ्या प्रयत्नात थेट देशात दुसरा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

नवी दिल्ली : केंद्रीय लोक सेवा आयोगाने (UPSC) शुक्रवारी निकाल घोषित केला. यात दुसरा आलेल्या 23 वर्षीय अक्षत जैनच्या यशाची कहाणी अचंबित करणारी आहे. अक्षत पहिल्या प्रयत्नात 2 गुण कमी पडल्याने यूपीएससी परीक्षेत नापास झाला होता. मात्र, त्याने आपल्या अभ्यासाच्या जोरावर दुसऱ्या प्रयत्नात थेट देशात दुसरा येण्याचा मान मिळवला आहे.

यूपीएससी परीक्षेमध्ये आलेल्या पहिल्या अपयशातून अक्षतने निराश न होता नव्या प्रेरणेने परिश्रमाला सुरुवात केली. आपल्या कष्टाच्या जोरावर तो पुढील प्रयत्नात फक्त उत्तीर्ण न होता थेट देशात दुसरा आला. अक्षतने यूपीएससीमधील आपल्या यशाचा आनंद व्यक्त करताना सांगितले, ‘दुसरा क्रमांक येणे तर दूरच पण मी यशस्वी उमेदवारांच्या यादीतही निवडलो जाईल याचीही मला आशा नव्हती.’

विशेष म्हणजे आपली मुलाखत एवढीही चांगली गेली नव्हती असेही अक्षतने नमूद केले. अक्षत म्हणाला, “माझ्या यशाचे श्रेय मी देवाला, माझ्या कुटुंबीयांना आणि मित्रांना देईल. त्यांनी मला शक्य त्या प्रकारे मदत केली आणि पाठिंबा दिला. मी खूप अभ्यास करायचो, मात्र याचा अर्थ यंत्राप्रमाणे विश्रांती न घेता करत होतो असेही नाही. मी विश्रांती घेऊन मित्रांसोबत बाहेर मजा मस्ती करायलाही जायचो.”

अक्षतचे वडील डी. सी. जैन एक आयपीएस अधिकारी आहेत. ते केंद्रीय अन्वेषण विभागात संयुक्त संचालक आहेत. तसेच अक्षतची आई सिम्मी जैन आयआरएस अधिकारी आहेत. अक्षतचे शिक्षण जयपूरमध्ये झाले. 12 वीनंतर त्याने आयआयटी गुवाहाटीमधून ‘डिझाइन’चे पदवीचे शिक्षण घेतले.

व्हिडीओ पाहा: संबंधित बातम्या:

UPSC Result : पहिल्याच प्रयत्नात देशात पाचवा क्रमांक मिळवणारी सृष्टी देशमुख कोण आहे?

औरंगाबादमध्ये वॉटर ऑपरेटरच्या मुलाचं यूपीएससीत घवघवीत यश, देशात 155 वी रँक

लढाई-पढाई आणि निवडही एकत्रच, पुण्यातल्या रुममेटची यूपीएससीत बाजी

यूपीएससीत महाराष्ट्राचा झेंडा, सृष्टी देशमुखचा देशात पाचवा क्रमांक

UPSC Result : पुण्यातल्या पोरांचा दिल्लीत झेंडा, यूपीएससीत घवघवीत यश

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.