सरकारी डॉक्टरांच्या नावाचा गैरवापर, कल्याणमध्ये बनावट मृत्यू दाखला प्रकरणी तीन डॉक्टरांना अटक

शासकीय डॉक्टरांच्या नावाने बनावट मृत्यू दाखला देणाऱ्या तीन डॉक्टरांना कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

सरकारी डॉक्टरांच्या नावाचा गैरवापर, कल्याणमध्ये बनावट मृत्यू दाखला प्रकरणी तीन डॉक्टरांना अटक
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 9:01 PM

कल्याण : शासकीय डॉक्टरांच्या नावाने बनावट मृत्यू दाखला देणाऱ्या तीन डॉक्टरांना (Fake Death Certificate) कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. एका कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे (Fake Death Certificate).

कल्याण पूर्वेतील साई स्वास्तिक या खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. यानंतर रुग्णालय व्यवस्थापनाने या व्यक्तीचा मृत्यूदाखला नातेवाईकांच्या हाती दिला. काही दिवसानंतर ही बाब समोर आली की, मृत्यू दाखल्यावर ज्या डॉक्टरची सही आणि शिक्का आहे, तो डॉक्टर या हॉस्पिटलमध्ये कार्यरतच नाही.

ही बाब उल्हासनर सेंट्रल हॉस्पिटलचे डॉक्टर अरुण चंदेल यांना माहिती झाली. डॉक्टर चंदेल यांच्या नावावर बनावट मृत्यूदाखला दिला गेला होता. याप्रकरणी डॉक्टर चंदेल यांनी साई स्वास्तिक हॉस्पिटलच्या चार डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी किरण वाघ यांनी हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

या प्रकरणी चारपैकी तीन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. डॉ. तुषार टेंगे, डॉ. स्वप्नील मुळे, डॉ. सतीश गिते या तिघा डॉक्टरांना पोलिसांनी कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालायने तिघांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या डॉक्टरांच्या कारनाम्यामुळे डॉक्टरी पेश्याला काळिमा फासला गेल्याची घटना घडली.

Fake Death Certificate

संबंधित बातम्या :

फुटपाथवर झोपलेल्या कुटुंबातील बाळाची चोरी; अवघ्या चार तासात चौघांना अटक

रेल्वे ट्रॅकवरुन चालताना लूट, तरुणाला आठ वर्षांनी दागिने परत मिळाले

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.