नवी मुंबईत एकाच कुटुंबातील चौघांची सामूहिक आत्महत्या

मुळ दिल्लीचे असलेल्या आणि आत्ता नवी मुंबईत येऊन राहत असलेल्या एकाच कुटुंबातील चौघांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नवी मुंबईत एकाच कुटुंबातील चौघांची सामूहिक आत्महत्या
Follow us
| Updated on: Feb 22, 2020 | 4:39 PM

नवी मुंबई : मुळ दिल्लीचे असलेल्या आणि आत्ता नवी मुंबईत येऊन राहत असलेल्या एकाच कुटुंबातील चौघांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे (Family Suicide in Taloja). यात पती-पत्नीसह दोन मुलांचा समावेश आहे. हे कुटुंब तळोजा येथील शिवकॅनर बिल्डींगमध्ये राहत होतं. पोलिसांना घटनास्थळावर सुसाईड नोट मिळाली असून याचा अधिक तपास सुरु आहे.

मुळचं दिल्लीचं हे कुटुंब सप्टेंबर 2019 मध्ये तळोजा येथे राहण्यास आलं. यानंतर काही महिन्यांमध्येच कुटुंबाने सामूहिक आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. पोलिसांना घरात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये आपण स्वतःहून ही आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. मात्र, पोलीस या प्रकरणात सर्व शक्यता तपासत आहेत. पोलिसांनी चारही मृतदेह पनवेल जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. याचा अहवाल आल्यानंतरच आत्महत्येमागील मुळ कारणं समोर येणार आहेत. तळोजा पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोजामधील संबंधित इमारतीच्या सातव्या मजल्यावर एका बेडरुममध्ये 4 मृतदेह सापडले. यात साधारण 35 वर्षे वय असलेला युवक, 30 वर्षे वय असलेली महिला आणि अनुक्रमे 7 व 8 वर्षांचा मुलगा व मुलगी यांचा समावेश आहे. संबंधित युवकाचा मृतदेह डोकं अडकलेल्या अवस्थेत आणि धड खाली पडलेल्या अवस्थेत सापडला. घर मालकांनी स्वतः बाहेरुन दरवाजा उघडला. दरवाजा आतून बंद होता, त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडील डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला.

तपास अधिकारी म्हणाले, “प्राथमिक निरिक्षणांवरुन आत्महत्या केल्याचं दिसत आहे. परंतू आम्ही सर्व शक्यता गृहीत धरल्या आहेत. हे कुटुंब कोठून आलं होतं, त्यांचा व्यवसाय काय होता या अनुषंगाने आम्ही तपास सुरु केला आहे. घर मालकांनी सप्टेंबर 2019 मध्ये घर भाड्यानं दिलं होतं. डिसेंबर-जानेवारीपासून त्यांचं भाडं थकित होतं आणि ते फोन उचलत नव्हते. मालकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दरमहिन्याच्या 5 ते 6 तारखेला ते भाडं द्यायचे. या महिन्यात भाडंही दिलं नाही आणि फोन देखील उचलला नाही. म्हणून काय झालं हे पाहण्यासाठी मालक आले. त्यांनी सोसायटीच्या चेअरमन आणि सचिव यांना सोबत घेऊन दरवाजा उघडला. यानंतर त्यांना हा सर्व प्रकार झाल्याचं लक्षात आलं. याची माहिती त्यांनी पोलिसांना दिल्यानंतर आम्ही याचा तपास सुरु केला आहे.”

मागील काही काळात संपूर्ण कुटुंबानेच आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलून सामूहिक पाऊल उचलल्याच्या घटना घडत आहेत. दिल्लीतही अशाच घटनेने खळबळ माजली होती. आता मुंबईतील या घटनेने पुन्हा एकदा नागरिकांना दिल्लीच्या प्रकरणाची आठवण करुन दिली आहे.

Family Suicide in Taloja

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.