प्रियकराला कंटाळून प्रसिद्ध अभिनेत्रीची आत्महत्या

प्रियकराला कंटाळून प्रसिद्ध अभिनेत्रीची आत्महत्या

मुंबई : तेलगू अभिनेत्री एस. नागा झांसीने प्रेमात धोका मिळाल्यामुळे आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. हैदराबाद पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. नागा झांसीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी सुर्या तेजा याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन आठवड्यांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

अभिनेत्री नागा झांसीने 5 फेब्रुवारीला श्रीनगर कॉलनी येथील आपल्या राहत्या घरात पंख्याला लटकत फास लावून घेतला. अभिनेत्री नागा ही 21 वर्षाची होती. तिने पवित्र बंधन या टीव्ही सीरियलमध्ये काम केलं आहे. नागाच्या कुटुंबीयांनी आत्महत्येसाठी सुर्या तेजा याला जबाबदार धरत त्याच्या विरुद्ध तक्रार केली. यानंतर पेलिसांनी त्याला अटक केली.

सुर्या तेजा हा विजयवाडामध्ये मोबाईलचे दुकान चालवतो. गेल्या एप्रिल महिन्यापासून सुर्या अभिनेत्री नागा झांसीच्या संपर्कात होता. यामधून या दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. नागाने जुलैमध्ये आपल्या कुटुंबीयांना तिने सुर्याबद्दल माहिती देत आपण लग्न करणार असल्याचे सांगितले. त्याचवेळी ती एक आठवडा नागाच्या घरीही राहिली होती. नोव्हेंबर महिन्यात नागाने सुर्याच्या वाढदिवसानिमित्त गिफ्ट म्हणून बाईकही दिली होती. मागच्या मिहन्यात सुर्या नागाच्या घरी म्हणाला, जर तिने अभिनय सोडला तरच मी तिच्याशी लग्न करेल. मात्र नागाने ही अट मान्य केली आणि स्व:ताच ब्युटी पार्लर सुरु केले.

सुर्या तरीसुद्धा तिच्यावर संशय घेत होता आणि तिच्यावर अनेक मुलांसोबत बोलत असल्याचा आरोप करत होता. गेले काही दिवस सुर्या नागाकडे दुर्लक्ष करु लागला आणि तिचे फोन उचलणे त्याने बंद केले. पोलिसांच्या चौकशी दरम्यान नागा पाच दिवस घरात एकटी होती आणि ती तणावात होती. सुर्या लग्नासाठी दुसरी मुलगी शोधत असल्यामुळे नागा मानसिक तणावाखाली होती. तर आरोपीने नागाला धोका दिला असल्याचा आरोप फेटाळला आहे.

Published On - 6:38 pm, Wed, 13 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI