VIDEO : तहानेने व्याकूळ नाग फणा काढून उभा, नागाची तहान शेतकऱ्याने भागवली

सांगली : उन्हाचा चटका फक्त माणसांनाच नाही, तर प्राण्यांनाही बसत आहे. मात्र, पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नसल्याने प्राण्यांसाठी तहान भागवणे कठीण होत आहे. त्यातूनच पाण्याविना अनेक प्राण्यांचा तडफडून मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या. मात्र सांगलीतील एका शेतकऱ्याने माणुसकीचे दर्शन घडवत पाण्यासाठी तडफडणाऱ्या नागाला पाणी देत जीवनदान दिले. त्यानंतर पाणी पिताना नागाचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. VIDEO […]

VIDEO : तहानेने व्याकूळ नाग फणा काढून उभा, नागाची तहान शेतकऱ्याने भागवली
Follow us
| Updated on: May 27, 2019 | 8:18 PM

सांगली : उन्हाचा चटका फक्त माणसांनाच नाही, तर प्राण्यांनाही बसत आहे. मात्र, पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नसल्याने प्राण्यांसाठी तहान भागवणे कठीण होत आहे. त्यातूनच पाण्याविना अनेक प्राण्यांचा तडफडून मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या. मात्र सांगलीतील एका शेतकऱ्याने माणुसकीचे दर्शन घडवत पाण्यासाठी तडफडणाऱ्या नागाला पाणी देत जीवनदान दिले. त्यानंतर पाणी पिताना नागाचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.

शिराळामधील  शिवनी मळ्यात दुपारच्या वेळी भर उन्हात एक नाग पाण्यासाठी तडफडत होता. हे दृश्य श्रीराम नांगरे पाटील या शेतकऱ्याच्या निदर्शनास आले. त्यावेळी श्रीराम नांगरे पाटील यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता उन्हाने तडफडू लागलेल्या नागाला पकडून त्याच्या डोक्यावर पाणी ओतत शांत केले. त्यावेळी या नागाने पाणीही पिले. त्यानंतर नागाला पुन्हा सुरक्षित ठिकाणी सोडून देण्यात आले.

नागाला पाणी पिताना पाहणे हे तसे फार दुर्मिळ चित्र आहे. त्यामुळे कडाक्याच्या उन्हात नागाची पाण्यासाठी वनवन आणि शेतकऱ्याने दिलेले पाणी पिण्याची घटना याची परिसरात चांगलीच चर्चा सुरु आहे. त्यामुळे सांगलीत उन्हाचा मोठा फटका प्राण्यांनाही बसत असल्याचे समोर येत आहे.

यातून पुन्हा एकदा प्राण्यांसाठी उन्हाळ्यात पाण्याची सोय करण्याची आवश्यकता अधोरेखित होत आहे. वन्यप्राणी मित्रांकडूनही यासाठी काही ठोस उपाय योजनेची मागणी होत आहे.

Non Stop LIVE Update
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.