बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली, सौदे थांबल्याने 45 हजार टन माल शिल्लक

अगोदर कोरोना आणि त्यांनतर परतीच्या पावसामुळे शेतकरी पूर्ण पणे अडचणीत आला असून बेदाण्याला योग्य भाव मिळावा हीच माफक अपेक्षा शेतकरी करत आहेत.

बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली, सौदे थांबल्याने 45 हजार टन माल शिल्लक
Follow us
| Updated on: Oct 29, 2020 | 4:31 PM

सांगली : सांगली जिल्ह्यात 1 लाख 50 हजार टन बेदाण्याचे उत्पादन झालं असून, त्यापैकी 1 लाख 5 हजार टन बेदाण्याची विक्री झाली आहे. फेब्रुवारी ते 20 ऑक्टोबरपर्यंत सांगली आणि तासगाव इथल्या बेदाणा सौद्यात 1 हजार 250 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. सांगली जिल्ह्यात सध्या 45 हजार टन बेदाणा शिल्लक आहेत. अगोदर कोरोना आणि त्यांनतर परतीच्या पावसामुळे शेतकरी पूर्ण पणे अडचणीत आला असून बेदाण्याला योग्य भाव मिळावा हीच माफक अपेक्षा शेतकरी करत आहेत. (farmers in tension because 45000 tones of raisins still pending deals stop for zero payment)

सांगली, तासगाव, पंढरपूर आणि विजापूर इथं बेदाण्याची मोठी उलाढाल होते. इथून देश आणि विदेशात बेदाणा पाठवला जातो. या हंगामात विजापुरात 25 हजार टन, पंढरपूर 30 हजार टन आणि सांगली, तासगाव इथं 1 लाख 50 हजार टन बेदाणा दाखल झाला होता. त्यापैकी 1 लाख 5 हजार टन बेदाण्याची विक्री झाली आहे. सांगली जिल्ह्यात सध्या 45 हजार टन बेदाणा शिल्लक आहे.

यापैकी सांगली, तासगाव इथल्या बेदाणा सौद्यामध्ये 20 ऑक्टोबरपर्यंत एक लाख पाच हजार टन बेदाण्याची विक्री झाली. विक्री झाल्यानंतर अडते आणि व्यापारी यांच्यात जो खरेदी-विक्री व्यवहार झालेला असतो त्या पैशाचा हिशोब करण्यासाठी 21 ऑक्टोंबर ते 27 नोव्हेंबर या महिन्याच्या कालावधीत सौदे बंद आहेत.

सर्वसाधारण बेदाण्यास प्रतिकिलो 165 ते 200 रुपये, लांबडा बेदाणा 125 ते 150 रुपये, मध्यम 100 ते 125 रुपये आणि काळ्या बेदाण्यास प्रतिकिलो 40 ते 55 रुपये दर मिळाला. शरद सीडलेस काळ्या बेदाण्यास 150 रुपये किलो दर मिळाला आहे. या हंगामामध्ये बेदाण्याची 1 हजार 250 कोटींची उलाढाल झाली आहे. (farmers in tension because 45000 tones of raisins still pending deals stop for zero payment)

उत्पादन वाढूनही दर चांगला नाही कोरोनामुळे द्राक्षांची निर्यात झाली नसल्यामुळे वीस ते तीस टक्के बेदाण्याचे जादा उत्पादन झाले. तरीही चांगल्या बेदाण्यास प्रतिकिलो 165 ते 200 रुपये दर मिळाला. दिवाळीत चांगली उलाढाल होईल. दिवाळीनंतर होणाऱ्या सौद्यात चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा बेदाणा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, झिरो पेमेंटसाठी 27 नोव्हेंबरपर्यंत सौदे बंद राहणार आहेत. परराज्यातील व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या फसवणुकीमुळे झिरो पेमेंट ही व्यवस्था निर्माण केली आहे. झिरो पेमेंट म्हणजे अगोदरचे शेतकऱ्यांचे पूर्ण पैसे दिल्याशिवाय व्यापाऱ्यांना परत सौद्यात सहभागी होता येत नाही. त्यामुळे झिरो पेमेंटसाठी 27 नोव्हेंबरपर्यंत सौदे बंद राहणार आहेत. सौदे बंद राहणार असले तरीसुद्धा बेदाण्याला या पेक्षा ही अधिकचा भाव मिळू शकतो असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.

इतर बातम्या – 

आता भारतातील दुकानदारांची Amazon आणि Flipkart ला टक्कर, 7 कोटी व्यापाऱ्यांचा अनोखा उपक्रम

रेल्वे, लोकलमध्ये विनामास्क प्रवास कराल तर भरावा लागेल दंड!

(farmers in tension because 45000 tones of raisins still pending deals stop for zero payment)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.