FASTag च्या माध्यमातून नवा रेकॉर्ड; डिसेंबरमध्येच 200 कोटींची टोलवसुली

फास्टॅगच्या माध्यमातून टोल व्यवहारात 1.35 कोटींची वाढ झालीय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:22 PM, 5 Jan 2021
FASTag च्या माध्यमातून नवा रेकॉर्ड; डिसेंबरमध्येच 200 कोटींची टोलवसुली

नवी दिल्लीः डिसेंबर 2020 मध्ये फास्टॅग (FASTag) मार्फत टोलवसुली 2,303.79 कोटी रुपये झालीय. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) मंगळवारी सांगितले की, मागील महिन्याच्या तुलनेत टोलवसुलीत 201 कोटी रुपये जास्त जमा झालेत. त्याचप्रमाणे फास्टॅगच्या माध्यमातून टोल व्यवहारात 1.35 कोटींची वाढ झालीय. (Fastag New Record Toll Collection Increased By Rs 200 Crore In December)

सरकारने 1 जानेवारी 2021 पासून फास्टॅगचा वापर अनिवार्य केला होता. लोकांना असुविधेपासून वाचवण्यासाठी राष्ट्रीय महामार्गांवर 15 फेब्रुवारीपर्यंत (फास्टॅगसह रोख पेमेंट) टोलशिवया वाहनांना परवानगी देण्यात आलीय. एनएचएआयने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “फास्टॅगमार्फत टोलवसुली डिसेंबर 2020 मध्ये 201 कोटी रुपयांनी वाढून 2303.79 कोटी रुपयांवर पोहोचली. जी नोव्हेंबर 2020मध्ये 2102 कोटी रुपये होती. फास्टॅगच्या माध्यमातून मासिक आधारे डिसेंबरमध्ये 1.35 कोटींहून अधिकची देवाण-घेवाण झालीय.

या निवेदनात म्हटले आहे की, “13.84 कोटी रुपये डिसेंबरमध्ये फास्टॅगच्या माध्यमातून जमा झालेत, जे नोव्हेंबर 2020 मधील 12.48 कोटी व्यवहारांपेक्षा 10.83 टक्क्यांनी अधिक आहेत. तसेच 2.30 कोटी फास्टॅग वापरकर्त्यांसह एकूण टोल संकलनात हे 75 टक्क्यांहून अधिक योगदान आहे. “ई-टोलचे लक्ष्य साध्य करण्यासाठी15 फेब्रुवारी, 2021 पर्यंत सर्व टोल पेमेंट फास्टॅगमार्फत केले जाणार आहे.

फास्टॅग कसे कार्य करते?

फास्टॅग हा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि NHAI चा एक उपक्रम आहे. ही इलेक्ट्रॉनिक टोल संकलन यंत्रणा आहे. एक एक रेडिओ फ्रीक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टॅग आहे, जो वाहनांच्या पुढच्या काचेवर बसविला जातो. जेणेकरून टोल प्लाझामधून जाताना तिथे असलेले सेन्सर वाचू शकतील. जेव्हा फास्टॅगची लावलेलं वाहन टोल प्लाझावरून जाते, तेव्हा फास्टॅगशी संबंधित प्रीपेड किंवा बचत खात्यातून टोल टॅक्स आपोआप वजा केला जातो.

फास्टॅग कुठे खरेदी कराल? कसे रिचार्ज कराल?

NHAI आणि 22 वेगवेगळ्या बँकेतून तुम्ही फास्टॅग खरेदी करू शकता. पेटीएम, अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफार्मवरही ते उपलब्ध आहे. त्याशिवाय Fino Payments Bank आणि Paytm Payments Bank कडूनही फास्टॅग दिलं जातं. जर फास्टॅग NHAI प्रीपेड वॉलेटशी कनेक्ट असेल तर चेकच्या माध्यमातून यूपीआय/ डेबिट कार्ड/ क्रेडिट कार्ड/ NEFT/नेट बँकिंग आदींच्या माध्यमातून रिचार्ज केलं जातं. जर बँक खात्याशी फास्टॅग लिंक असेल तर तुमच्या खात्यातून थेट पैसे कट होतील. जर Paytm वॉलेटला फास्टॅग कनेक्ट असेल तर त्यातून थेट रक्कम कापली जाते.

किती रिचार्ज करणार? वैधता किती?

तुमच्या फास्टॅग अकाऊंटमध्ये तुम्हाला किमान 100 रुपये ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक बँक त्यांच्या हिशोबाने रक्कम कट करेल. जर तुम्ही 200 रुपयांत एखाद्या बँकेतून फास्टॅग खरेदी केला तर तुम्हाला करही भरावा लागणार आहे. फास्टॅगची वैधता नसते. (FASTag to be mandatory for all vehicles from January 1: Nitin Gadkari)

फास्ट टॅगशिवाय मार्गिकेत घुसल्यास?

तुमच्याकडे फास्टॅग नसेल तर तुम्हाला कोणीच मार्शल लाईनमध्ये घुसू देणार नाही. जर तुम्ही चुकून फास्टॅगच्या मार्गिकेत घुसल्यास तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागणार आहे.

संबंधित बातम्या

FASTag | वाहनचालकांना दिलासा, टोलनाक्यांवरील FASTag साठी मुदतवाढ

1 जानेवारीपासून सर्व वाहनांवर Fastag अनिवार्य; नितीन गडकरी यांची घोषणा

Fastag New Record Toll Collection Increased By Rs 200 Crore In December