भिक मागून कमी पैसे आणल्याने वडिलांकडून मारहाण, पाच वर्षीय मुलाचा हात फ्रॅक्चर

भिक मागून कमी पैसे आणल्यामुळे विडलांनी हाताचे हाड मोडले, असा आरोप पाच वर्षीय मुलगा सूर्या संजू बारीने आपल्या वडिलांवर (Father beaten boy palghar) केला.

भिक मागून कमी पैसे आणल्याने वडिलांकडून मारहाण, पाच वर्षीय मुलाचा हात फ्रॅक्चर

पालघर : भिक मागून कमी पैसे आणल्यामुळे वडिलांनी केलेल्या मारहाणीत मुलाच्या हाताचे हाड मोडले, असा आरोप पाच वर्षीय मुलगा सूर्या संजू बारीने (Father beaten boy palghar) केला. ही घटना पालघरमध्ये घडली आहे. सूर्याचे हाड मोडल्यामुळे सध्या त्याच्यावर पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु (Father beaten boy palghar) आहेत.

डोक्यावर छप्पर नसलेल्या आणि अठरा विश्वे दारिद्र्याने ग्रासलेला संजू बारी हा पालघर पूर्वेतील गांधीनगर परिसरात मैदानात छप्पर टाकून राहतो. संजू त्याची पत्नी आणि चिमुकला सूर्याला भीक मागायला लावतो. मिळालेल्या पैशातून स्वतः दारु पिऊन मौज मजा करतो. सूर्या हा गरीब असून भीक मागून तो त्याचा उदरनिर्वाह करतो, असं त्याच्या शेजारी राहणाऱ्याने सांगितले.

चार दिवसांपूर्वी चिमुकला सूर्या पालघर शहरात नेहमीप्रमाणे भीक मागून घरी आला. घरी आल्यानंतर पैसे कमी आणले या रागाने त्याच्या वडिलाने त्याच्या डाव्या हातावर एका दंडुक्याने प्रहार केला. त्यात सूर्याच्या हाताचे हाड मोडले. ही झटापट होताना शेजाऱ्याने संजूला थांबवले. मात्र वेदनेने विव्हळत असलेला सूर्या त्यावेळी तेथून पळून गेला.

दोन दिवसानंतर मंगळवारी (4 फेब्रुवारी) पालघर शहरातील बिकानेरी येथे सूर्या नेहमीप्रमाणे आला. तिथे तो उभा राहून रडत होता. इथे काम करणाऱ्या आणि तिथे उभ्या असलेल्या काही तरुण मुलांनी त्याच्याकडे तू का रडत आहे असा जाब विचारला. मात्र सुरुवातीला तो काहीच बोलला नाही. या मुलांनी त्याचा विश्वास संपादन केल्यानंतर सूर्याने वडिलांनी मारले असल्याचे सांगितले.

तो सिगरेट पितो म्हणून मी त्याला मारले. पण त्याने सांगितले की मी त्याच्या हातावर दांडका मारला, असं सूर्याचे वडील संजू बारी यांनी सांगितले.

सूर्याचे हाड मोडले असल्याने केवल घरत, सनी जैन, पिंटू ठाकूर आणि प्रथम बोरडेकर या तरुणांनी ग्रामीण रुग्णालयात त्याला दाखल केले. तिथे आल्यानंतर त्याच्या डाव्या हाताचे हाड मोडल्याचे कळले. ग्रामीण रुग्णालयात आरोग्य अधिकारीसह आरोग्य कर्मचारी आणि आरोग्य सेवा देणाऱ्या वर्षा काटेला यांनीही सूर्याच्या उपचारासाठी बरीच खटाटोप करत त्याच्यावर उपचार केले.

दरम्यान, सूर्याला मारल्याप्रकरणी त्याचा बाप संजू बारी याचा जबाब पोलिसांनी घेतला असून पोलिस पुढील तपास करीत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI