जन्मदात्या आई-वडिलांकडूनच मुलाची हत्या, 3 वर्षीय चिमुकलीच्या साक्षीमुळे प्रकार उघड

लग्नानंतर आपल्याला मुलं व्हावी ही इच्छा प्रत्येक आई वडिलांची असते. आपल्या लेकरासाठी आई-वडील मोठे कष्ट उपसतात. मात्र, बुलडाण्यात जन्मदात्या आई-वडिलांकडूनच मुलाची हत्या झाल्याची खळबळजनक घटना बुलडाण्यात घडली

जन्मदात्या आई-वडिलांकडूनच मुलाची हत्या, 3 वर्षीय चिमुकलीच्या साक्षीमुळे प्रकार उघड

बुलडाणा : लग्नानंतर आपल्याला मुलं व्हावी ही इच्छा प्रत्येक आई वडिलांची असते. आपल्या लेकरासाठी आई-वडील मोठे कष्ट उपसतात. मात्र, बुलडाण्यात जन्मदात्या आई-वडिलांकडूनच मुलाची हत्या झाल्याची खळबळजनक घटना बुलडाण्यात घडली (Father Mother murder son in Buldhana). विशेष म्हणजे एका 3 वर्षीय मुलीच्या समोर हत्या झाली. त्यानंतर याच चिमुकलीच्या साक्षीने आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. आरोपी आईवडिलांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुका अंतर्गत जामोद गावाला लागून असलेल्या लोनखेड शिवारात काही आदिवासी कुटुंबं राहतात. यामध्ये 25 वर्षीय मृतक रामभाऊ आणि त्याचे आरोपी आई-वडीलही राहत होते. 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी काही शुल्लक कारणावरून मृतक रामभाऊ आणि त्याचे आई-वडील यांच्यात वाद झाला. त्याचं रूपांतर हाणामारीत झालं. वडील आणि मुलगा दोघेही दारुच्या नशेत असल्याने राग अनावर होऊन वडिलांनी रामभाऊच्या डोक्यात कुदळीने वार केला. आई सुगराबाई यांनी देखील ठिबकच्या नळीने मुलगा रामभाऊला फाशी दिली. यातच मुलाचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच जळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन आरोपींचा शोध सुरु केला. दरम्यान आरोपींच्या घरात राहणारी त्यांच्या नातेवाईकांची 3 वर्षीय मुलगी पार्वती हिने पोलिसांसमोर या खुन प्रकरणाचा उलगडा केला. मिळालेल्या माहिती आधारे तपास करुन पोलिसांना आरोपींना अटक केली. चौकशीमध्ये हत्येचं कारण स्पष्ट झालं.

मृत मुलगा दारुच्या आहारी गेला होता. तो नेहमी आपल्या आई वडिलांकडे दारुसाठी पैशांची मागणी करायचा. त्यामुळे त्यांच्यात नेहमीच वाद व्हायचे. घटनेच्या दिवशीही त्यांच्यात याच कारणावरुन जोरदार भांडण झालं. यातच व्यसनाधीन रामभाऊचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतकाच्या आई-वडिलांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने आरोपींना 8 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI