चौथीही मुलगी झाल्याने नाखुश; तीन मुलींना विहिरीत ढकलून पित्याची आत्महत्या

चौथीही मुलगी झाल्याने नाखुश; तीन मुलींना विहिरीत ढकलून पित्याची आत्महत्या

रसिक यांना तीन मुली आहेत. मात्र, त्यांना मुलगा हवा होता. मुलाच्या अट्टाहासापायी रसिक यांची पत्नी चौथ्यांदा गर्भवती झाली. मात्र, चौथ्यांदाही रसिक यांच्या पत्नीने मुलीला जन्म दिला, तेव्हा मात्र रसिक अत्यंत दु:खी झाले.

Nupur Chilkulwar

|

Dec 20, 2019 | 10:12 PM

गांधीनगर : एका पित्याने आपल्या तीन मुलींना विहिरीत ढकलल्यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी (20 डिसेंबर) गुजरातच्या राजकोटमध्ये घडली (Father throws daughters in well). मृत पिता हा जुनागडचा राहणारा असून रसिक सोळंकी असं त्याचं नाव आहे. रसिक सोळंकी हे जीआरपीचे जवान आहेत. रसिक सोळंकी यांच्या लग्नाला दहा वर्ष झाली आहेत. रसिक यांना तीन मुली आहेत. मात्र, त्यांना मुलगा हवा होता. मुलाच्या अट्टाहासापायी रसिक यांची पत्नी चौथ्यांदा गर्भवती झाली. मात्र, चौथ्यांदाही रसिक यांच्या पत्नीने मुलीला जन्म दिला, तेव्हा मात्र रसिक अत्यंत दु:खी झाले (Father killed three daughters).

दोन आठवड्यांपूर्वी रसिक यांच्या पत्नीने चौथ्या मुलीला जन्म दिला. त्यानंतर त्यांची पत्नी आपल्या नवजात बाळाला घेऊन काही दिवसांसाठी त्यांच्या माहेरी गेल्या. याचा फायदा घेत रसिक यांनी तीनही मुलींना गाडीवर बसवलं आणि गावाच्या बाहेर शेतात  नेलं.

शेतात गेल्यानंतर रसिक यांनी त्यांच्या तीन मुलींना शेतातील 100 फूट खोल विहिरीत ढकलून दिलं. त्यानंतर त्यांनी स्वत:ही शेतातील झाडाला लटकून गळफास घेतला. रसिक यांनी आत्महत्या केलेलं शेत हे त्यांच्याच भावाचं होतं. शेतात काम करणाऱ्या एका मजूराने रसिकला झाडाला लटकलेल्या अवस्थेत पाहिलं आणि ही घटना रसिकचे भाऊ वाल्जीला सांगितले. वाल्जी यांनी रसिकला त्यांच्या तीन मुलींसोबत गावाबाहेर जाताना पाहिलेलं होतं.

मजुराच्या सागंण्यावरुन वाल्जी तात्काळ शेतात गेले. तिथे त्यांना त्यांचा भाऊ रसिक हा झाडाला लटकलेला दिसला. मात्र मुली कुठेही दिसल्या नाहीत, त्यामुळे त्यांनी मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना शेतातील विहिरीत तीनही मुलींचा मृतदेह तरंगताना दिसला. स्थानिक लोकांच्या मदतीने या मुलींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

तीन मुलींनंतर चौथीही मुलगी झाल्याने रसिक निराश होते. त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले, असं भेसन पोलीस ठाण्याचे उप-निरीक्षक एम. सी. चुडस्मा यांनी सांगितलं.

Father throws daughters in well

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें