संभाजीराजेंवर आक्षेपार्ह टीका भोवली, अ‍ॅड गुणरत्न सदावर्तेंवर नाशिकनंतर पुण्यातही गुन्हा दाखल

अ‍ॅड गुणरत्न सदावर्ते (Adv Gunaratna Sadavarte) यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (FIR against Adv Gunaratna Sadavarte in Pune)

संभाजीराजेंवर आक्षेपार्ह टीका भोवली, अ‍ॅड गुणरत्न सदावर्तेंवर नाशिकनंतर पुण्यातही गुन्हा दाखल

पुणे : अ‍ॅड गुणरत्न सदावर्ते (Adv Gunaratna Sadavarte) यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी सदावर्ते अडचणीत आले आहेत. अमर रामचंद्र पवार असे तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तिचे नाव आहे. त्यांच्यावर कलम 153(ब) नुसार गुन्हा दाखल केला आहे. (FIR against Adv Gunaratna Sadavarte in Pune)

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी काल एका वृत्तवाहिनीवर खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. अफजलाच्या औलादी आणि अफजलाच्या वृत्तीचे….. मी असल्या छत्रपती गाद्यांना मानत नाही असे सदावर्ते म्हणाले होते. यावर मराठा समाजाने आक्रमक पावित्रा घेतला होता.

मराठा समाजाचे श्रद्धास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशजांचा एकेरी उल्लेख करुन सकल मराठा समाजाचा अपमान होईल. तसेच जाती-पातीमध्ये तेढ निर्माण होऊन दंगली भडकतील, सार्वजनिक शांततेचा भंग होईल, अशी वादग्रस्त विधाने सदावर्ते यांनी केली आहेत. त्यामुळे सकल मराठा समाजाच्या भावना दुखावल्याने अमर रामचंद्र पवार यांनी कायदेशीर तक्रार दाखल केली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सदावर्तेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला होता. त्यानंतर आज अखेर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी काल नाशिकमधील सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दखल करण्यात आला होता.

कोण आहेत गुणरत्न सदावर्ते?

गुणरत्न सदावर्ते हे व्यवसायाने वकील आहेत. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, यासाठी ते सर्वोच्च न्यायालयात याचिका लढवत आहेत. मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केल्याबद्दल सदावर्ते यांनी आपल्याला अनेक धमक्‍या मिळाल्याचा आरोप केला आहे.

प्रशिक्षणानंतरही 154 पोलिसांची फौजदारपदी न झालेली नियुक्ती, ज्येष्ठ नागरिक कायदा, ‘मॅट’च्या माध्यमातून चार हजार परिचारिकांना नोकरीत कायम करणे, हैदराबाद उच्च न्यायालयात रोहित वेमुला प्रकरणात चौकशीची मागणी करणारी याचिका अशा अनके केस त्यांनी हाताळलेल्या आहेत. (FIR against Adv Gunaratna Sadavarte in Pune)

संबंधित बातम्या : 

संभाजीराजेंवरील आक्षेपार्ह टीका अंगलट, गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा

Published On - 9:54 am, Sat, 10 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI