पुण्यात साड्यांच्या दुकानाला भीषण आग, 5 कामगारांचा होरपळून मृत्यू

पुणे : पुण्यातील देवाची ऊरळी येथी राजयोग साडी सेंटरला मध्यरात्री लागलेली भीषण आग आता आटोक्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि दहा टँकरना आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे. या राजयोग साडी सेंटरमध्ये पाच कामगार अडकले होते. पाचही कामगारांचा आगीत होरपळून आणि धुरामध्ये गुदमरुन मृत्यू झाला. राकेश मेहवाल, राकेश रियाड, धर्मराम बडीयासर, सुरज शर्मा […]

पुण्यात साड्यांच्या दुकानाला भीषण आग, 5 कामगारांचा होरपळून मृत्यू
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:47 PM

पुणे : पुण्यातील देवाची ऊरळी येथी राजयोग साडी सेंटरला मध्यरात्री लागलेली भीषण आग आता आटोक्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि दहा टँकरना आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे.

या राजयोग साडी सेंटरमध्ये पाच कामगार अडकले होते. पाचही कामगारांचा आगीत होरपळून आणि धुरामध्ये गुदमरुन मृत्यू झाला. राकेश मेहवाल, राकेश रियाड, धर्मराम बडीयासर, सुरज शर्मा आणि धीरज चांडक असे मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांची नावं आहे.

घटना कशी घडली?

मृत्यूमुखी पडलेले कामगार राजयोग साडी सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावर झोपले होते. रात्री अचानक आग लागली. राजयोग साडी सेंटरचा मालक दुकानाला बाहेरुन कुलूप लावून, दुकान बंद करत असे. कामगार रोज दुकानात झोपत असत. दुकानाला बाहेरुन कुलूप लावणं पाचही कामगारांच्या जीवावर बेतलं.

अग्निशमन दलाने दुकाने बंद असल्याने पाठीमागील बाजूने जेसीबीने भिंत तोडली आणि मदतकार्य सुरु केलं. मात्र, तोपर्यं पाचही कामगार आगीने होरपळले आणि धुराने गुदमरले होते.

राजयोग साडी सेंटरला नेमकी आग कशामुळे लागली किंवा आगीचं नेमकं कारण अद्याप कळू शकलं नाही.

MAP : आग नेमकी कुठे लागली?

Non Stop LIVE Update
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.