दिल्लीत पुन्हा अग्नितांडव! प्रिंटिंग प्रेसमधील आगीत एकाचा मृत्यू

दिल्लीत पुन्हा एकदा आगीची घटना घडली आहे. या आगीत होरपळून एकाचा मृत्यू झाला आहे.

दिल्लीत पुन्हा अग्नितांडव! प्रिंटिंग प्रेसमधील आगीत एकाचा मृत्यू

नवी दिल्ली : दिल्लीच्या पटपडगंजमधील औद्योगिक भागातील असलेल्या प्रिंटिंग प्रेसमध्ये भीषण आग लागली (fire breaks out at printing press in Delhi). या आगीत एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या 35 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या आगीमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे (fire breaks out at printing press in Delhi).

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत वारंवार आगीच्या घटना घडत आहेत. आठवड्याभरापूर्वी म्हणजे 2 जानेवारी 2019 रोजी दिल्लीतील पीरागढी येथील एका फॅक्टरीला भीषण आग लागली होती. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या धान्य बाजारात मोठी आग लागली होती. या आगीत होरपळून 43 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर किराडीमध्येही अशाप्रकारची घटना घडली होती. यात 9 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा अशाच एका अग्नीतांडवाची घटना घडली आहे.

Published On - 8:05 am, Thu, 9 January 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI