अरुण जेटली उपचार घेत असलेल्या एम्समध्ये भीषण आग

एम्सच्या टिचिंग ब्लॉकमध्ये ही आग लागली असून अग्निशमन दलाच्या 22 गाड्यांकडून आग विझवली जात आहे. चार मजले रिकामे करण्यात आले असून आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

अरुण जेटली उपचार घेत असलेल्या एम्समध्ये भीषण आग

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत प्रसिद्ध एम्स हॉस्पिटलमध्ये भीषण आग (AIIMS Fire) लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचं बोललं जातंय. प्राथमिक माहितीनुसार ही आग (AIIMS Fire) पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर लागल्याची माहिती आहे. एम्सच्या टिचिंग ब्लॉकमध्ये ही आग लागली असून अग्निशमन दलाच्या 22 गाड्यांकडून आग विझवली जात आहे. चार मजले रिकामे करण्यात आले असून आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

आगीनंतर एम्समधील आपत्कालीन विभाग बंद करण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार, एम्समधील दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. विशेष म्हणजे माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींवर एम्समध्ये सध्या उपचार सुरु आहेत. राष्ट्रपतींपासून ते पंतप्रधानांपर्यंत व्हीव्हीआयपींची एम्समध्ये ये-जा सुरु आहे. त्यामुळे एम्सपुढे मोठं आव्हान निर्माण झालंय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI