वायूसेनेची ताकद वाढणार, जगातील सर्वात बलाढ्य ‘अपाचे’ हेलिकॉप्टर वायूसेनेत दाखल

जगातील सर्वात बलाढ्य आणि अत्याधुनिक मानल्या जाणाऱ्या एच-64इ अपाचे गार्जियन अटॅक हेलिकॉप्टरचा पहिला ताफा भारतात पोहोचला आहे. पहिल्या ताफ्यात चार हेलिकॉप्टर वायूसेनेत दाखल होतील.

वायूसेनेची ताकद वाढणार, जगातील सर्वात बलाढ्य ‘अपाचे’ हेलिकॉप्टर वायूसेनेत दाखल
Follow us
| Updated on: Jul 27, 2019 | 11:50 PM

नवी दिल्ली : जगातील सर्वात बलाढ्य आणि अत्याधुनिक मानल्या जाणाऱ्या एच-64इ अपाचे गार्जियन अटॅक हेलिकॉप्टरचा पहिला ताफा भारतात पोहोचला आहे. पहिल्या ताफ्यात चार हेलिकॉप्टर वायूसेनेत दाखल होतील. वायूसेनेत दाखल होण्यासाठी या हेलिकॉप्टरला हिंडन एयरबेसवरुन पठाणकोट एयरबेसवर पाठण्यात आले आहे. वायूसेनेत हे हेलिकॉप्टर एमआय-35 हेलिकॉप्टरची जागा घेईल.

अमेरिकन कंपनी बोईंग निर्मिती AH-64E हेलिकॉप्टर जगातील सर्वात अत्याधुनिक आणि घातक हेलिकॉप्टरपैकी एक मानलं जातं. भारताने अमेरिकेसोबत 22 अपाचे हेलिकॉप्टरचा करार केला आहे. यापैकी चार हेलिकॉप्टर भारतात पाठवण्यात आले आहेत. तर, येत्या आठवड्यात आणखी चार हेलिकॉप्टर भारतात येतील. यापूर्वी अमेरिकेच्या एरिझोना येथील प्रोडक्शन फॅसिलिटी सेंटरमध्ये भारतीय वायूसेनेला पहिला अपाचे हेलिकॉप्टर मिळाला होता.

या हेलिकॉप्टरमुळे भारताची घरात घुसून मारण्याची क्षमता कित्येक पटींनी वाढणार आहे. अपाचे हे पहिलं असं हेलिकॉप्टर आहे, जे भारतीय सैन्यात नियोजनबद्ध पद्धतीने हल्ला करण्यात सक्षम असेल. भारतीय सेनेकडून आतापर्यंत रशियन निर्मिती एमआय-35 चा वापर केला जात होता, पण हे हेलिकॉप्टर आता निवृत्त होण्याच्या मार्गावर आहे.

अपाचे हेलिकॉप्टरची प्रमुख वैशिष्ट्ये

  • Boeing AH-64E अमेरिकन सैन्य आणि आंतरराष्ट्रीय संरक्षण बलांसाठी आधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर आहे, जे विविध कामं एकाचवेळी करण्यात सक्षम आहे.
  • अमेरिकेने या अपाचे हेलिकॉप्टरचा वापर पनामापासून ते अफगाणिस्तान आणि इराकमधील शत्रूंसोबतही केला आहे.
  • अमेरिकन सैन्याच्या अत्याधुनिकतेसाठी हे हेलिकॉप्टर तयार करण्यात आलं होतं. या हेलिकॉप्टरने पहिली उड्डाण 1975 साली घेतली, पण अमेरिकन सैन्यात हे हेलिकॉप्टर 1986 मध्ये दाखल झालं.
  • अमेरिकेशिवाय इस्रायल, इजिप्त आणि नेदरलँडकडेही अपाचे हेलिकॉप्टर आहे.
  • अपाचे अटॅक हेलिकॉप्टरमध्ये दोन जनरल इलेक्ट्रिक T700 टर्बोशिफ्ट इंजिन आणि पुढच्या बाजूने एक सेन्सर आहे, ज्यामुळे रात्रीच्या अंधारातही उड्डाण घेता येते. 365 किमी प्रति तास वेगाने धावण्याची क्षमता या हेलिकॉप्टरमध्ये आहे.
  • या हेलिकॉप्टरमध्ये हेलिफायर आणि स्ट्रिंगर मिसाईल लावण्यात आलेले आहेत, तर दोन्ही बाजूंना 30mm च्या गन आहेत. या हेलिकॉप्टरमध्ये एवढी विस्फोटकं भरली जाऊ शकतात की ज्यामुळे शत्रूचं वाचणं अशक्य होऊन जातं.
  • या हेलिकॉप्टरचं वजन 5165 किलो असून यामध्ये दोन पायलट्ससाठी जागा आहे.
  • इंटिग्रेटेड हेलमेट, डिस्प्ले साइटिंग सिस्टम (Integrated Helmet and Display Sighting System), हेल्मेट माऊंडेट डिस्प्ले ही अपाचे हेलिकॉप्टरची सर्वात क्रांतीकारी फीचर मानली जातात. यामुळे हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या ऑटोमॅटिक M230 चेन गनचा निशाणा शत्रूवर साधता येतो.

VIDEO : 

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.