जपान विधानसभा निवडणुकीत ‘योगीं’चा विजय

टोकियो (जपान) : भारतीय वंशाचे जपानी नागरिक योगेंद्र पुराणिक यांनी जपान विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. जपानमधील निवडणुकीत विजय मिळवणारे पुराणिक पहिले भारतीय आहेत. ते 41 वर्षांचे आहेत. विशेष म्हणजे पुराणिक हे महाराष्ट्रातील पुण्याचे आहेत. पुराणिक यांना प्रेमाने सर्वजण योगी म्हणतात. योगी जपानच्या कॉन्स्टीट्यूशनल डेमोक्रेटिक पक्षाकडून निवडणूक रिंगणात होते. योगींना 6,477 मतांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळाला. त्यांना […]

जपान विधानसभा निवडणुकीत 'योगीं'चा विजय
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:58 PM

टोकियो (जपान) : भारतीय वंशाचे जपानी नागरिक योगेंद्र पुराणिक यांनी जपान विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. जपानमधील निवडणुकीत विजय मिळवणारे पुराणिक पहिले भारतीय आहेत. ते 41 वर्षांचे आहेत. विशेष म्हणजे पुराणिक हे महाराष्ट्रातील पुण्याचे आहेत. पुराणिक यांना प्रेमाने सर्वजण योगी म्हणतात. योगी जपानच्या कॉन्स्टीट्यूशनल डेमोक्रेटिक पक्षाकडून निवडणूक रिंगणात होते. योगींना 6,477 मतांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळाला. त्यांना 2,26,561 वैध मतांमध्ये सर्वाधिक 6,477 मतं मिळाली. योगी यांनी टोकियोमधील एदोगावा वॉर्ड विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे.

योगी पहिल्यांदा 1997 मध्ये जपानमध्ये गेले होते. त्यावेळी ते कॉलेजमध्ये शिकत होते. त्यानंतर जपानमधील दोन वर्षांच्या अभ्यासक्रमानंतर योगी भारतात परतले. 2001 मध्ये इंजिनीअर बनल्यानंतर योगी पुन्हा जपानमध्ये गेले. जपानमध्ये त्यांनी एका बँकेत नोकरी केली आणि 2005 मध्ये ते एदोगावा येथे राहायला आले. योगींनी जपानची नागरिकता मिळवली आणि तेथील राजकारणात प्रवेश केला.

Yogendra Puranik campaigning for Tokyo council elections. Guts and Hard work all the way? pic.twitter.com/EhHgb3gn1H

“जपानमध्ये भूकंप आणि त्सुनामी आली तेव्हा मी जपानच्या नागरिकांसोबत जोडलो गेलो. यावेळी मी जपानमधील भारतीय नागरिकांसोबत मिळून तेथील पीडितांसाठी जेवण बनवण्याचं काम केलं. तेव्हा मी ठरवले की, जपानचे नागरिकत्व घेणार आणि इथल्या लोकांसाठी काम करणार. मी गेल्या 20 वर्षांपासून जपानमध्ये राहत आहे”, असं योगी म्हणाले.

योगी ज्या विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. तिथे सर्वाधिक भारतीय राहतात. टोकियोच्या 23 वॉर्डमधील राहणाऱ्या 4,300 लोकांमध्ये दहा टक्के लोक भारतीय आहेत. जपानमध्ये एकूण 34 हजार भारतीय राहतात. तसेच योगींच्या वॉर्डमध्ये चायनीज आणि कोरियनलोकही राहतात.

“जपानच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे जपानी नागरिकाने पहिल्यांदा येथील निवडणुकीत विजय मिळवला आहे. जपानच्या समाजात भारतीयांचे योगदान आहे”, असं चेजिंग डायनामिक्स ऑफ इंडिया-जपान रिलेशंसचे लेखक शमशाद म्हणाले.

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.