कल्याण-डोंबिवली दरम्यान पाच तासांचा मेगाब्लॉक, 16 एक्स्प्रेस रद्द

ठाकुर्ली रेल्वे स्टेशनवर पादचारी पुलाच्या कामासाठी उद्या (25 डिसेंबर) पाच तासांचा मेगाब्लॉक (Megablock Kalyan-Dombivali) घेण्यात आला आहे.

  • Updated On - 1:09 pm, Tue, 24 December 19 Edited By:
कल्याण-डोंबिवली दरम्यान पाच तासांचा मेगाब्लॉक, 16 एक्स्प्रेस रद्द

मुंबई : ठाकुर्ली रेल्वे स्टेशनवर पादचारी पुलाच्या कामासाठी उद्या (25 डिसेंबर) पाच तासांचा मेगाब्लॉक (Megablock Kalyan-Dombivali) घेण्यात आला आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली दरम्यानची रेल्वे सेवा पाच तास बंद राहणार आहे. ऐन नाताळच्या दिवशी मेगाब्लॉक घेण्यात आल्यामुळे प्रवाशांनी नाराजी (Megablock Kalyan-Dombivali) व्यक्त केली आहे.

मुंबईच्या ठाकुर्ली रेल्वे स्थानकावर पादचारी पूलाचे गर्डर उभारण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उद्या 25 डिसेंबर रोजी सकाळी 9.45 ते दुपारी 1.45 पर्यंत असा पाच तासाचा मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली दरम्यानची वाहतूक पाच तास पूर्णपणे बंद राहणार आहे. मेगाब्लॉक घेण्यात आल्यामुळे 16 मेल आणि एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

मनमाड-मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस, मनमाड-मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस, सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेस, सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, दादर-जालना-दादर जनशताब्दी, सीएसएमटी-कोल्हापूर-सीएसएमटी महालक्ष्मी एक्स्प्रेस, सीएसएमटी-भुसावळ-सीएसएमटी पॅसेंजर यासह इतर गाड्यांचा समावेश आहे.

रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकमुळे लोकल सेवेवरही परिणाम होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ऐन नाताळाच्या दिवशी मेगाब्लॉक घेण्यात आल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.