देशात पोलिसांची एकूण साडे पाच लाख पदं रिकामी

देशात कायद्यानुसार 24 लाख 84 हजार 170 पोलीस कर्मचारी असणे गरजेचे आहे. पण देशात केवळ 19 लाख 41 हजार 473 पोलीस कर्माचारी आहेत. याचा अर्थ मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या जागा भरणे गरजेचे आहे.

देशात पोलिसांची एकूण साडे पाच लाख पदं रिकामी

नवी दिल्ली : देशात सद्यस्थितीतला 24 लाख 84 हजार 170 पोलीस कर्मचारी असणे गरजेचे आहे. पण केवळ 19 लाख 41 हजार 473 पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. याचा अर्थ मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या जागा भरणे अवश्यक आहे. देशाची लोकसंख्या पाहता प्रत्येक राज्यात आणि शहरात पोलिसांचे संख्या बळ कमी पडते. ही माहिती डेटा ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंटने संकलित केली आहे.

या माहितीनुसार 1 जानेवारी 2018 रोजीनुसार देशात पोलिसांची एकूण 5.43 लाख पदं रिकामी आहेत. तर उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 1.29 लाख पोलिसांच्या जागा रिकाम्या आहेत. देशात एकमेव नागालँड असं राज्य आहे जिथे मर्यादेपेक्षा अधिक पोलीस कर्मचारी आहेत.

2016 मध्ये देशात 22 लाख 80 हजार 691 पोलीस कर्माचाऱ्यांची गरज होती. तर 2017 मध्ये 24 लाख 64 हजार 484 आणि 2018 मध्ये 24 लाख 84 हजार 170 पोलिसांची गरज होती.

देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशात 4 लाख 14 हजार 492 पदं आहेत. पण यामधील 1 लाख 28 हजार 952 पदं रिकामी आहेत. बिहारमध्ये 1 लाख 28 हजार 286 पदं आहेत. पण 77 हजार 995 पदं भरलेली आहेत.  पश्चिम बंगालमध्ये 1 लाख 40 हजार 904 पोलीस कर्मचाऱ्यांची गरज आहे. पण येथे 48 हजार 981 पदं रिकामी आहेत.

देशाची राजधानी दिल्लीतही अशीच परिस्थिती आहे. दिल्लीतील पोलीस दलात 11 हजार 819 पदं रिकामी आहेत. दिल्ली, आंध्र प्रदेश, झारखंड, हरियाणा, तेलंगाना, केरळ आणि ओडिशासारख्या राज्यातही अशीच परिस्थिती आहे.

नागालँड देशातील एकमेव राज्य आहे. जिथे 21 हजार 292 पदं आहेत. पण येथे 941 पोलीस कर्मचारी अधिक आहेत. नक्षलग्रस्त प्रभाग छत्तीसगढमध्येही 11 हजार 916 पदं रिकामी आहेत. दहशतवाद्यांनी त्रस्त असलेले राज्य जम्मू-काश्मिरमध्येही 10 हजार 044 पदं रिकामी आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI