युगांडातील 26 वर्षीय तरुणीवर पुण्यात गँगरेप

पुण्यातील धानोरीजवळच्या मैदानात आरोपी आणि त्याच्या मित्राने आपल्यावर सामूहिक बलात्कार केला, असा आरोप पीडितेने केला आहे.

युगांडातील 26 वर्षीय तरुणीवर पुण्यात गँगरेप

पुणे : युगांडातील 26 वर्षीय तरुणीवर पुण्यात सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप (Foreigner Girl Gang Rape in Pune) करण्यात येत आहे.

पुण्यातील धानोरीजवळच्या मैदानात आरोपी आणि त्याच्या मित्राने आपल्यावर सामूहिक बलात्कार केला, असा आरोप पीडितेने केला आहे. पुण्यातील विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडल्याची माहिती आहे.

तक्रारदार 26 वर्षीय तरुणीचा साड्यांच्या आयात-निर्यातीचा व्यवसाय आहे. पीडिता सोमवारी रात्री मुंढवा परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवायला गेली होती. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ती घरी जाण्यासाठी कॅब बुक करत होती. त्यावेळी आरोपी तरुण बाईकवर तिच्याजवळ आला. त्याने इंग्रजीमध्ये बोलत तिला लिफ्ट देण्याचं आमिष दाखवलं.

दादर परिसरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 9 मुलींची सुटका, एका आरोपीला अटक

काही अंतर गेल्यानंतर आरोपीने आपल्या मित्राला बोलावून घेतलं. त्यांनी तरुणीला जबरदस्तीने बाईकवर बसवून विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका निर्जनस्थळी नेलं. तिथे दोघांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे.

तरुणीने पहाटे विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पीडित तरुणी मूळची युगांडा देशातील असून ती सध्या पुण्यातील कोंढवा परिसरात बहिणीकडे राहत आहे. पोलिस सामूहिक बलात्कार प्रकरणी (Foreigner Girl Gang Rape in Pune) पुढील तपास करत आहेत.

Published On - 3:48 pm, Tue, 24 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI