सेहवागच्या पत्नीची साडेचार कोटी रुपयांची फसवणूक

टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागच्या पत्नीने त्यांच्या व्यवसाय भागीदारांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. व्यवसाय भागीदारांनी त्यांचे बोगस हस्ताक्षर करुन 4.5 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं आणि ते फेडलंही नाही, असा आरोप विरेंद्र सेहवागची पत्नी आरती यांनी केला आहे.

सेहवागच्या पत्नीची साडेचार कोटी रुपयांची फसवणूक

नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागच्या पत्नीने त्यांच्या व्यवसाय भागीदारांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. व्यवसाय भागीदारांनी त्यांचे बोगस हस्ताक्षर करुन 4.5 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं आणि ते फेडलंही नाही, असा आरोप विरेंद्र सेहवागची पत्नी आरती यांनी केला आहे.

एका कृषी-आधारीत कंपनीमध्ये भागीदार असलेल्या आरती यांनी शुक्रवारी ही तक्रार दाखल केली. यामध्ये रोहित कक्कड या भागीदारासह त्यांनी आठ भागीदारांची नाव घेतली आहेत. परवानगी न घेता या भागीदारांनी दिल्लीच्या एका कर्जदाराकडून कर्ज घेतल्याचा आरोप आरती यांनी केला.

आरती यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी या भागीदारांविरोधात कलम 420 अंतर्गत फसवणूक आणि अप्रामाणिकपणा, कलम 468, कलम 471 अंतर्गत बोगस कागदपत्रांचा वापर इत्यादी कमलांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी भागीदारांनी पती विरेंद्र सेहवागच्या नावाचा चुकीचा वापर करुन कर्जदारांना प्रभावित केलं आणि त्यानंतर एका तिहेरी करारावर आरती यांचे बोगस हस्ताक्षर केले. कर्जदारांना दोन पोस्ट डेटेड चेक देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर कंपनी कर्जाची परतफेड करण्यात असमर्थ ठरली, असं आरती सेहवाग यांनी सांगितलं.

कंपनीने या कर्जाची परतफेड न केल्याने कर्जदाराने अराती यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. तेव्हा आरती यांना या सर्व घटनेची माहिती मिळाली. त्यांच्या नकळत त्यांच्या बोगस सह्या करुन हे कर्ज घेतल्याचं लक्षात आलं, असं आरती यांनवी सांगितलं .

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI