Manmohan Singh Birthday : मनमोहन सिंहांचा मंदीविरोधात लढण्यासाठी सहा सूत्री कार्यक्रम

भारताचे माजी पंतप्रधान, देशात अर्थक्रांती घडवणारे अर्थतज्ज्ञ, बोलणं कमी आणि काम जास्त अशी उपमा ज्यांच्यासाठी कायम वापरली जाते, ते डॉ. मनमोहन सिंह आज 89 वर्षांचे झालेत. (Former Pm Manmohan singh Birthday)

Manmohan Singh Birthday : मनमोहन सिंहांचा मंदीविरोधात लढण्यासाठी सहा सूत्री कार्यक्रम

मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान, देशात अर्थक्रांती घडवणारे अर्थतज्ज्ञ, बोलणं कमी आणि काम जास्त अशी उपमा ज्यांच्यासाठी कायम वापरली जाते, ते डॉ. मनमोहन सिंह आज 89 वर्षांचे झालेत…देशाची आर्थिक घडी उत्तम राहावी यासाठी मनमोहन सिंहांनी कायमच मोलाचं योगदान दिलं. अगदी 1991 ला जागतिकीकरण, उदारीकरण आणि खासगीकरणाचं धोरण राबवणं असो, की पंतप्रधान असताना बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी सुरु करण्यात आलेली मनरेगा योजना, किंवा प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क देणारा शिक्षणाचा अधिकार, या सगळ्याचं श्रेय मनमोहन सिंहांनाच जातं. (Former Pm Manmohan singh Birthday)

आजपासून वर्षभरापूर्वी डॉ. मनमोहन सिंहानी मोदी सरकारला आर्थिक मंदी दूर करण्यासाठी सहा सूत्री कार्यक्रम दिली होता. सरकारनं हेडलाईन मॅनेजमेंटमधून बाहेर येत आर्थिक मंदीची परिस्थिती मान्य करावी, आणि गांभीर्यानं काम करावं असं ते म्हणाले होते.. मनमोहन सिहांनी दिलेले हे 6 उपाय कुठले होते हे आपण पाहुयात…

यातील पहिला उपाय होता

01. जीएसटीमध्ये सुलभता– मंदीवर मात करण्यासाठी सरकारने जीएसटी प्रणालीत मोठ्या प्रमाणात सुलभता आणावी आणि ही व्यवस्था तर्कसंगत करावी. यामुळे थोड्या काळासाठी महसूल बुडाला तरी चालेल, पण जीएसटी प्रणाली सुरळीत हवी असं त्यांनी म्हटलं होतं…
कोरोना परिस्थितीत राज्यांना जीएसटीचा परतावा मिळाला नाही, जीएसटीत सुलभता नसल्यानं अनेक अडचणी निर्माण झाल्या, त्यामुळं मनमोहन सिंहांचा हा सल्ला नक्कीच फायद्याचा होता असं म्हणावं लागेल.

02. यातील दुसरा उपाय होता शेतीचं पुनरुज्जीवन : सरकारने ग्रामीण भागाची खरेदी करण्याची क्षमता वाढवण्यासाठी लवकरात लवकर मार्ग काढणं गरजेचं आहे. यासोबतच शेतीचं पुनरुज्जीवन करुन शेतकऱ्यांच्या अडचणी कमी कराव्यात, असं ते म्हणाले होते.

03. तिसरा उपाय होता, भांडवल निर्मिती : सरकारने भांडवल निर्मिती करण्यासाठी येणाऱ्या अडथळ्यांवर मात करायला हवी. यामुळे फक्त सरकारी बँकाच नव्हे, तर NBFCलाही फटका बसला आहे असं म्हटलं होतं.

04. तर चौथा उपाय होता, रोजगार केंद्रीत क्षेत्रावर भर : टेक्स्टाईल, ऑटो, इलेक्ट्रॉनिक्स आणि परवडणारे घरं या नोकऱ्या देणाऱ्या क्षेत्रांवर सरकारने भर द्यावा अशी त्यांची मागणी होती. विशेषतः कर्जाची हमी द्यावी आणि सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांवर जास्त भर देण्याचंही त्यांनी सुचवलं होतं.

05. पाचव्या उपायात त्यांनी निर्यातीला प्रोत्साहन देण्यास सांगितलं होतं : अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे ज्या देशाचं मार्केट आपल्यासाठी खुलं झालंय, ते शोधून संधीचं सोनं करावं, असा सल्ला त्यांनी दिला होता. कोरोना परिस्थिती पुन्हा एकदा याच दोन देशातील व्यापार युद्ध शिगेला पोहचलंय…त्यामुळं त्यावेळी मनमोहन सिहांनी केलेलं भाकीत अगदी खरं ठरतंय.

06. सहाव्या आणि शेवटच्या उपायात त्यांनी, पायाभूत सुविधा वाढवण्यास सांगितलं होतं. मोठ्या प्रमाणात सार्वजनिक पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले होते. गरज पडल्यास खासगी गुंतवणूक करुन पायाभूत सुविधा वाढवा असं ते म्हणाले होते…

डॉ. मनमोहन सिंह यांना भारताचं अर्थचक्र जेवढं कळतं, तेवढं कळणारी माणसं आज देशात फार कमी आहेत, यामुळं पुन्हा देशाला एका मनमोहन सिहांची गरज असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. डॉ. मनमोहन सिंहाचं भारताच्या जडणघडणीत, आर्थिक मजबूतीत खूप मोलाचा वाटा आहे. त्यामुळंच त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांचं मार्गदर्शन देशाला कायम लाभो हीच अपेक्षा…!

(Former Pm Manmohan singh Birthday)

संबंधित बातम्या

देशाला आज एका मनमोहन सिंगांची गरज : शरद पवार

मंदीविरोधात लढण्यासाठी मनमोहन सिंहांचा सहा सूत्री कार्यक्रम

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI