कर्करोगी रुग्णांसाठी 14 वर्षीय मुलीचा धाडसी निर्णय

कर्करोगी रुग्णांसाठी 14 वर्षीय मुलीचा धाडसी निर्णय

कर्करुग्णांच्या विगसाठी वर्ध्यातील एका चौदा वर्षीय मुलीने आपले केस दान केले आहे. ऋत्विजा मून असं या मुलीचे (Girls hairs donate to cancer patients wardha) नाव आहे.

सचिन पाटील

| Edited By:

Dec 21, 2019 | 5:11 PM

वर्धा : कर्करुग्णांच्या विगसाठी वर्ध्यातील एका चौदा वर्षीय मुलीने आपले केस दान केले आहे. ऋत्विजा मून असं या मुलीचे (Girls hairs donate to cancer patients wardha) नाव आहे. या मुलीनं आपल्या सौंदर्याची काळजी न करता केस दान केल्याने सर्वच स्तरातून तिचे कौतुक केले जात आहे. महिला, मुली केसांबद्दल अधिकच संवेदनशील असतात. कुणी लांबसडक केस राहू देतात, तर कुणी केसांना वेगवेगळे आकार देत सौंदर्य (Girls hairs donate to cancer patients wardha) खुलवण्याचा प्रयत्न करत असतात.

ऋत्विजा मून पुण्याच्या ऑक्सफोर्ड इंटरनॅशनल पब्लिक स्कुलमध्ये नवव्या वर्गाला शिकत आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत डोक्यावरील केस तिच्या सौंदर्यात भर घालत होते. पण तिने स्वत:च डोक्यावरील केस काढण्याचा निर्णय घेतला आहे. आई मंगेशी मून यांच्या प्रेरणेतून ऋत्विजानं आपले केस कर्करुग्णांकरीता दान केले आहेत.

पुण्यात बसमध्ये जाताना तिला टक्कल पडलेली मुलगी दिसली आणि ऋुत्विजानं क्षणाचाही विचार न करता केसदान करण्याचा निर्णय घेतला. तिच्या केसांमुळं काहींच्या चेहऱ्यावर हास्य खुलणार असल्याचं समाधान ती व्यक्त करत आहे. कुणी ही बाब हसण्यावर नेतात तर कुणाला तिच्या या कार्याच्या अभिमानही वाटत आहे.

ऋत्विजाची आई मंगेशी मून या सामाजिक चळवळीत काम करतात. स्वत:च्या सुखापेक्षा शोषित, पीडितांच्या चेहऱ्यावर आनंद खुलवण्यासाठी त्या कार्य करतात. कर्करोगाच्या उपचारादरम्यान अनेकांचे केस गळतात. त्यांना टक्कल पडतं. त्यामुळं कर्करुग्णांची पीडा सांगत त्यांनीच ऋत्विजाला याबाबत प्रेरणा दिली. सुरूवातीला ऋत्विजानं नकार दिला. पण, नंतर तिने केस दान करण्याचा निर्णय घेतला.

ऋत्विजाचे केस कापून टक्कल करण्यात आलं आहे. हे केस मुंबई येथील मदत फाउंडेशनला पाठवण्यात आले आहेत. या केसांचा उपयोग कर्करुग्णांना विग बनवण्यास होणार आहे. केस कापल्यामुळं कुणी काय म्हणणार याचा विचार करण्याऐवजी तिच्या कार्यानं काहींच्या चेह-यावर नक्कीच हसू खुलणार आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें