सैन्य भरतीचं आमिष, नाशिक, धुळे, जळगावच्या 12 जणांना 42 लाखांचा गंडा, तरुणाला अटक

सैन्यामध्ये भरतीचे आमिष दाखवून जळगाव, नाशिक, धुळे जिल्ह्यातील 12 तरुणांची 42 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला (Fraud in army recruiting)  आहे.

सैन्य भरतीचं आमिष, नाशिक, धुळे, जळगावच्या 12 जणांना 42 लाखांचा गंडा, तरुणाला अटक

सातारा : सैन्यामध्ये भरतीचे आमिष दाखवून जळगाव, नाशिक, धुळे जिल्ह्यातील 12 तरुणांची 42 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला (Fraud in army recruiting)  आहे. सचिन डांगे असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणाची चौकशी पोलिसांकडून सुरु आहे.

साताऱ्यातील फलटण येथील संशयित आरोपी सचिन डांगे याने जळगाव, नाशिक, धुळे या जिल्ह्यातील 12 तरुणांना सैन्यात भरती करतो असे सांगत फसवणूक केली. सचिनने आतापर्यंत 42 लाखांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी अमोल गुलाब पाटील या तरुणाने फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानुसार संशयित आरोपी सचिन डांगे याला पोलिसांनी अटक केली आहे.

फलटणमध्ये असलेल्या लक्षवेद करिअर अ‍ॅकॅडमीमध्ये पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेऊन अमोल पाटीलने याच अॅकॅडमीत प्रशिक्षक म्हणून कामाला सुरुवात केली. या दरम्यान अमोलची आरोपी सचिनशी ओळख झाली. त्याने माझी सैन्यात ओळख असून कोणालाही सैन्य दलात भरती व्हायचे असेल, तर मला सांगा, पैसे भरुन काम करु शकतो, असे (Fraud in army recruiting)  सांगितले.

त्यानंतर अमोल पाटील मध्यस्थीने गरीब आणि गरजू मुलांकडून नोकरीच्या अमिषाने प्रत्येकाने किमान दीड ते 3 लाख रुपये त्याच्याकडे जमा केले. अशाप्रकारे सचिनकडे 42 लाख रुपये जमा झाले. यानंतर त्याने काही युवकांना 28 जानेवारी 2019, नोव्हेंबर 2019 आणि 15 जानेवारी 2020 अशा वेगवेगळ्या भरतीच्या तारखा दिल्या होत्या. यातील कोणत्याच तारखांना इच्छुक मुलांना भरतीबाबत पत्र आलं नाही. त्यानंतर या मुलांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

याप्रकरणी तक्रारदार अमोल पाटील यांनी यानंतर सचिन डांगे यांच्याविरोधात फलटण शहर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याने आतापर्यंत 12 तरुणांची फसवणूक केली आहे. या व्यतिरिक्त त्यांनी अन्य काही मुलांची फसवणूक केली आहे का? याचा पोलीस शोध घेत आहे. तसेच सध्या या प्रकरणाचा सखोल तपास पोलिसांकडून सुरु (Fraud in army recruiting)  आहे.