दुर्मिळ योग, गणपतीपुळे मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन, बाप्पाला स्पर्श करता येणार

राज्यभरात गणपती आगमनाचा उत्साह आहे. कोकणात हा उत्साह आणखी पाहायला मिळतो. गणेशाच्या स्वागतासाठी गणेशभक्त आतुर झाल्याचं चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे.

दुर्मिळ योग, गणपतीपुळे मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन, बाप्पाला स्पर्श करता येणार

Ganesh Chaturthi रत्नागिरी : राज्यभरात गणपती आगमनाचा उत्साह आहे. कोकणात हा उत्साह आणखी पाहायला मिळतो. गणेशाच्या स्वागतासाठी गणेशभक्त आतुर झाल्याचं चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे. कोकणातल्या गुहागर तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात आजही पारंपरिक पद्धतीने गणरायाला आपल्या डोक्यावरून आणलं जातं. कोकणातील वाडी वस्तीवर पारंपरिक पद्धतीने गणपती डोक्यावर घेऊन शेताच्या बांधावरून गणपतीचे आगमन होतं. पाट डोक्यावर ठेऊन त्यावर गणपती विराजमान होतो. ढोल ताशांच्या गजरात आपल्या लाडक्या गणरायाला डोक्यावर घेऊन घरी आणलं जातं आणि गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. भाताच्या हिगव्यागार शेतातून हे गणपती घरी आणले जातात.

घरगुती गणपतींना कोकणात विशेष महत्व आहे. आज 1 लाख 66 हजार घरगुती गणपतींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. गणेश चित्रशाळेतून गणपती घरी नेण्याची वेगळी परंपरा कोकणात पहायला मिळते.

बाप्पाल घरी नेताना गणेशमूर्तीशाळेत पानाचा विडा, सुपारी आणि दक्षिणा ठेवून गणपती बाप्पाचा जयघोष करुन आपल्या लाडका गणपती घरी घेवून जातात. या ठिकाणी गावातली मंडळी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत येतात. बाप्पाचा जयघोष असतो.

गाभाऱ्यात जाऊन गणरायाचं दर्शन

भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी म्हणजे घराघरात प्राणप्रतिष्ठापना होणाऱ्या दिवशीच गणपतीपुळ्याच्या स्वयंभू देवाला थेट स्पर्श करण्याची संधी मिळते. आपण परिधान केलेल्या वस्त्रांनी थेट गणपतीपुळ्याच्या गाभाऱ्यात जाऊन आपल्या लाडक्या गणरायाला हात लावून त्याला भेटण्याची, त्याचं दर्शन घेण्याची संधी मिळते. आज दुपारी 12 ते 4 दरम्यान गाभारा सर्वांसाठी खुला करण्यात येतो.

वर्षातून केवळ एक वेळा येणाऱ्या या संधीचं सोनं करण्यासाठी रत्नागिरीच्या गणपतीपुळे मंदिरात गणेशभक्तांनी गर्दी झाली आहे. भाद्रपद चतुर्थीला गेली कित्येक वर्ष ही अनोखी परंपरा सुरु आहे. आजही हजारो भक्तांनी थेट गाभाऱ्यात जात गणरायाचे आर्शिवाद घेतले.


Published On - 9:56 am, Mon, 2 September 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI