मुलींची छेड काढणाऱ्या रोड रोमिओला पीडित मुलीकडून चोप

मुलीची छेडछाड काढणाऱ्या एका रोड रोमिओला पीडित मुलीने (Girl beaten boy kurla station) चोप दिला. ही घटना आज (7 डिसेंबर) कुर्ला स्टेशनवर घडली.

मुलींची छेड काढणाऱ्या रोड रोमिओला पीडित मुलीकडून चोप

मुंबई : मुलीची छेडछाड काढणाऱ्या एका रोड रोमिओला पीडित मुलीने (Girl beaten boy kurla station) चोप दिला. ही घटना आज (7 डिसेंबर) कुर्ला स्टेशनवर घडली. ट्रेन पकडताना आरोपीने मुलीसोबत गैरवर्तणूक केली. त्यामुळे मुलीने (Girl beaten boy kurla station) आरोपीला चोप दिला. सध्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी आरोपीला पकडले असून अधिक चौकशी सुरु आहे.

दररोजच्या ट्रेन प्रवासात गर्दीमध्ये अनेकदा महिलांसोबत अशा प्रकारच्या घटना घडतात. मात्र यावर पीडित मुलीने आवाज उठवत रोड रोमिओला चांगलाच चोप दिल्याने तिचे कौतुक केले जात आहे.

“कुर्ला स्टेशनवरुन आम्ही चेंबूरला येत असताना त्या मुलाने आमच्यासोबत गैरवर्तन केले. ट्रेनमध्ये चढताना आणि उतरतानाही त्याने आमच्यासोबत पुन्हा गैरवर्तन केले. हेच कृत्य त्याने माझ्या मैत्रिणीसोबतही केले”, असं पीडित मुलीने सांगितले.

“दोन मुली कुर्ला स्टेशनवरुन चेंबूरला जात होत्या. यावेळी कुर्ल्यावरुन ती चढत असताना आरोपी मुलाने तिच्यासोबत दोन ते तीन  वेळा गैरवर्तन केले. मुलगी चेंबूरल्या उतरल्यावर तिने थेट आमच्याकडे धावत येऊन मुलाबद्दल तक्रार केली. त्यानंतर त्या मुलाला आम्ही अटक केली”, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.


Published On - 3:42 pm, Sat, 7 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI