पुण्यात भररस्त्यावर तरुणीचा विनयभंग, मदतीला आलेल्या मित्रालाही मारहाण

पुण्यात भररस्त्यावर तरुणीचा विनयभंग, मदतीला आलेल्या मित्रालाही मारहाण

पुणे : विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात आणखी एक गुन्हेगारी घटना समोर आली आहे. पुण्यात तरुणीसह मित्राला बेदम मारहाण करुन तरुणीचा विनयभंग करण्यात आलाय. रविवारी पहाटेच्या सुमारास दोघा तरुणांनी पाठलाग करुन तरुणीला मारहाण केली. या प्रकरणी 21 वर्षीय अविनाश धनकुडे आणि 22 वर्षीय शेखर कळमकरला अटक करण्यात आली आहे. दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

पीडित तरुणी ही शिक्षिका आणि सामाजिक काम करते. रविवारी पहाटे एका हॉटेलमधील पार्टीतून ती मित्राकडे जात होती. यावेळी दुचाकीवर जाणार्‍या तरुणीचा अविनाश आणि शेखरने पाठलाग केला. एका सोसायटीजवळ दोघांनी तरुणीची छेड काढली, यावेळी तरुणीने मित्राला बोलावल्यावर दोघांना बेदम मारहाण करण्यात आली.

पीडितेच्या मित्राला खाली पाडून मारहाण केली, तर तरुणीचा विनयभंग करण्यात आला. या मारहाणीची दृश्य सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहेत. सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या पुण्यात भररस्त्यात तरुणीचा अशा पद्धतीने विनयभंग झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय.

Published On - 4:35 pm, Mon, 18 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI