दाभोलकर-पानसरेंचे मारेकरी शोधून देतो, बक्षीसाचे 1 कोटी 80 लाख द्या : ज्योतिष

दाभोलकर-पानसरेंचे मारेकरी शोधून देतो, बक्षीसाचे 1 कोटी 80 लाख द्या : ज्योतिष


पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समिती डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि कलबुर्गी यांनी अंधश्रद्धा आणि कर्मकांडाला विरोध केलाय. या विचारधारेमुळे त्यांची हत्या झाली. मात्र पुण्यातील एका ज्योतिषचार्याने ज्योतिषच्या माध्यमातून दोघांच्या मारेकऱ्यांचा छडा लावू शकतो, असा दावा केलाय. मारेकरी कोण आणि कुठून आलेत, हे ज्योतिषच्या माध्यमातून सांगू शकतो. मात्र बक्षीसाची एक कोटी 80 लाखाची रक्कम देण्याचं आवाहन त्यांनी केलंय. पोलीस मारेकऱ्यांच्या अटकेवरून गोंधळल्याचा आरोपही छाजेड यांनी केला.

माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनीही सरकारवर टीका केली. मारेकऱ्यांना पकडण्याची सरकारमध्ये मानसिकता नाही. आरोपीच्या बचावासाठी सरकार प्रयत्न करतंय. फडणवीस सरकार आरएसएसचं असून आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप केलाय. आरएसएसने त्यांना असूर ठरवून ठार मारल्याचा आरोप केलाय.

दाभोलकर आणि पानसरे हत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. शिवाय या प्रकरणाच्या तपासासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती होणं अपेक्षित असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांवर ताशेरेही ओढले होते.

व्हिडीओ पाहा :

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI