सोन्याच्या दरात घट होण्याची शक्यता

ऐन लग्नसराईत दिवसागणिक वाढणारे सोन्याचे भाव आता उतरण्यास सुरुवात झाली आहे. या आठवड्यात सोन्याचे दर तोळ्यामागे 400 ते 800 रुपये स्वस्त होणार आहेत.

सोन्याच्या दरात घट होण्याची शक्यता
तज्ज्ञांच्या मते, पुढच्या काही दिवसांमध्ये सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. दिवाळीपर्यंत सोन्याची किंमत 60 ते 65 हजार प्रति 10 ग्रामपर्यंत पोहोचेल असं बोललं जात आहे.


मुंबई : ऐन लग्नसराईत दिवसागणिक वाढणारे सोन्याचे भाव आता उतरण्यास सुरुवात झाली आहे. या आठवड्यात सोन्याचे दर तोळ्यामागे 400 ते 800 रुपये स्वस्त होण्याची शक्यता आहे. याआधी सलग आठ दिवस सोन्याचे भाव चढते राहिले. सोन्याने गेल्या पाच महिन्यातील सर्वाधिक दराचा टप्पा गाठला होता. मात्र, आता जून किंवा जुलैमध्ये अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेने नवीन धोरण बदलण्याची आशा आहे. त्यामुळे गुतंवणूकदार सोने बाजारात आणखी गुंतवणूक करु शकतात आणि याच कारणामुळे सोन्याचे भाव कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोसोबतचा व्यवासायिक करार रद्द केला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दरात घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या कित्येक दिवसात सोन्याच्या भावात 4 टक्क्यांनी वाढ झाली होती. त्यामुळे सोन्याची दर प्रति 10 ग्रॅम 32 हजार 936  रुपयापर्यंत पोहोचला होता. विशेष म्हणजे डिसेंबर 2018 नंतर पहिल्यांदा सोन्याने एवढी उंची गाठली होती. सोन्याचे दर वाढण्याचे प्रमुख कारण अमेरिकेच्या शेअर बाजारातील उतार चढाव असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतात सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होण्याचं महत्त्वाचं कारण अमेरिका देश, तसेच अमेरिकेचे इतर देशांसोबत असलेले व्यावसायिक करार आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोसोबतचा व्यावसायिक करार संपवला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँक व्याज दर कमी करु शकते. त्यानंतर सोने स्वस्त होऊ शकते. तसेच व्याजदर कमी झाल्याने शेअर मार्केटमध्येही बदलाव पाहायला मिळू शकतात. मात्र दीर्घकालीन व्याजदरात कोणताही बदल होणार नसल्याने महागाईचा दर मात्र कायम राहणार आहे.

विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार, जूनच्या शेवटच्या आठवड्यात  किंवा जुलैमध्ये अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेने नवीन धोरण बदलणार आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतीत प्रति तोळा 800 रुपयाची घट होणार आहे. तर किलोमागे सोन्याची किंमत 80 हजार रुपये होऊ शकते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI