Republic Day : गुगलच्या डुडलमध्ये भारतीय संस्कृतीचं दर्शन

प्रजासत्ताक दिनाला संपूर्ण देशात उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे (Republic Day 2020). 71 व्या प्रजासत्ताक दिनाला दिल्लीच्या राजपथावर सेनेने आपलं शौर्य दाखवलं.

Republic Day : गुगलच्या डुडलमध्ये भारतीय संस्कृतीचं दर्शन
जीमेलमध्ये प्रायव्हसी लेबलचा समावेश

मुंबई : प्रजासत्ताक दिनाला संपूर्ण देशात उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे (Republic Day 2020). 71 व्या प्रजासत्ताक दिनाला दिल्लीच्या राजपथावर सेनेने आपलं शौर्य दाखवलं, दुसरीकडे देशातील सांस्कृतिक विविधतेत एकता, अखंडतेची झलक पाहायला मिळाली (Republic Day 2020). भारताच्या प्रजासत्ताक दिनाला गुगलने एक खास डुडल बनवलं आहे. या डुडलमध्ये वास्तू आणि सांस्कृतिक वारसासह भारताची समृद्ध जैवविविधता दर्शवण्यात आली आहे (Google Doodle).

प्रजासत्ताक दिनाच्या डुडलबाबत गुगलकडून एक ब्लॉगही पोस्ट करण्यात आला आहे. “भारताच्या 71 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सिंगापूरचा खास पाहुणा कलाकार मेरु सेठने भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये ताजमहाल आणि इंडिया गेट सारख्या जागतिकस्तरावरील प्रसिद्ध स्थळं, ते राष्ट्रीय पक्षी मोर, शास्त्रीय कला, वस्त्र आणि नृत्य यासर्वांचा समावेश आहे. ज्यामध्ये सर्व आपल्या मतभेदांना विसरुन सुसंवाद साधण्याचं काम करतात.”

1950 मध्ये आजच्याच दिवशी 26 जानेवारीला भारताचं संविधान लागू झालं होतं. पहिल्या प्रजासत्ताक दिनाला राजपथावर परेड झाली होती. तेव्हापासून ही परंपरा निरंतर सुरु आहे. प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिनाला परेडचं आयोजन केलं जातं. यामध्ये सेना त्यांच्या शौर्याचं प्रदर्शन करते. तसेच, देशातील वेगवेगळ्या राज्यातील चित्ररथ प्रदर्शित केले जातात. याच्या माध्यमातून देशातील विविधतेत एकतेचा संदेश दिला जातो. ‘

देशात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह

देशभरात 71 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला. दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण (Republic Day) करण्यात आले. या कार्यक्रमाला ब्राझीलचे राष्ट्रपती जायेर बोलसोनारो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानावर ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर मुंबईतील शिवाजी पार्कवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात (Republic Day) आला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI