ज्ञानेश्वरांना अभिवादनाने राज्यापालांच्या भाषणाला सुरुवात, छत्रपती शिवराय, डॉ. आंबेडकर स्मारकासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही

संत ज्ञानेश्वरांना अभिवादन करुन राज्यपालांनी भाषणाला सुरुवात केली. भाषणाच्या सुरुवातीला राज्यपालांनी राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या (Republic Day 2020).

  • हेमंत बिर्जे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 10:32 AM, 26 Jan 2020

मुंबई : “महाराष्ट्र सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बनवण्यास बांधिल आहे. याशिवाय इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बनवण्यास सरकार प्रयत्नशील आहे”, असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने मुंबईतील शिवाजी पार्कात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला (Republic Day 2020). या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी भगतसिंग कोश्यारी यांनी ध्वजारोहणानंतर संबोधित केलं (Republic Day 2020).

संत ज्ञानेश्वरांना अभिवादन करुन राज्यपालांनी भाषणाला सुरुवात केली. भाषणाच्या सुरुवातीला राज्यपालांनी राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

“वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत”, असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले. “शेती हा अर्थव्यवस्थेचा पाया आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी यासाठी आम्ही राज्यात शेतकरी कर्जमाफी योजना राबवली आहे. आम्ही 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज असणाऱ्यांसाठी वेगळी योजना आणणार आहोत. आम्ही 10 रुपयांत आहार ही योजना आजपासून सुरु करत आहोत. कमी रुपयात जेवण देण्याची ही योजना यशस्वी होईल, असा मला विश्वास आहे. त्याचबरोबर नरिमन पॉईंटचा कोस्टल रोड प्रकल्प लवकरच पूर्ण होईल”, असं राज्यपाल म्हणाले.

दरम्यान, “शहराच्या विकासाबरोबरच पर्यावरण सुरक्षेचीसुद्धा आपली जबाबदारी आहे. महाराष्ट्रात प्लॅस्टिक बंदी केली आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी आपण करणार आहोत”, असंदेखील राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सांगितलं.