VIDEO : लायसन्स, पीयूसीची गरज नाही, ग्रीनवोल्ट मोबिलिटीची नवीन बाईक लाँच

इलेक्ट्रॉनिक दुचाकी कंपनी Greenvolt Mobility ने आपली नवीन इलेक्ट्रिक बाईक 'Mantis' अहमदाबादमध्ये लाँच (Electronic bike launch in ahmedabad) केली.

VIDEO : लायसन्स, पीयूसीची गरज नाही, ग्रीनवोल्ट मोबिलिटीची नवीन बाईक लाँच


अहमदाबाद : इलेक्ट्रॉनिक दुचाकी कंपनी Greenvolt Mobility ने आपली नवीन इलेक्ट्रिक बाईक ‘Mantis’ अहमदाबादमध्ये लाँच (Electronic bike launch in ahmedabad) केली. त्यानंतर आता देशातील प्रमुख शहरात ही बाईक लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनी Greenvolt Mantis बाईक 22 डिसेंबरला मुंबईत आणि 5 जानेवारी 2020 रोजी बंगळुरुमध्ये लाँच करणार आहे. याशिवाय लवकरच पुणे, हैद्राबाद आणि चेन्नईमध्येही बाईक लाँच (Electronic bike launch in ahmedabad) केली जाणार आहे.

ग्रीनवोल्ट मोबिलिटीने मॅन्टिससाठी प्री-बुकिंग सुरु केली आहे. 999 रुपयात या बाईकची बुकिंग केली जाऊ शकते. कंपनी मुंबई, बंगळुरु आणि इतर शहरांमध्ये इलेक्ट्रिक बाईक प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी लाँचिंगदरम्यान टेस्ट राईड आयोजित करण्यात आली आहे.

किंमत

प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी मॅन्टिसची किंमत 34 हजार 999 रुपये आहे. तसेच डिलरशिप अॅक्टिव्ह झाल्यानंतर ही किंमत 37 हजार 999 रुपयामध्ये उपलब्ध होणार आहे. ग्रीनवोल्ट फेब्रुवारीपर्यंत आपल्या डीलर नेटवर्कच्या माध्यमातून निवडक शहरांमध्ये आऊटलेट आणि सर्व्हिस सेंटर सुरु करणार आहे.

मॅन्टिस बाईक चालवण्यासाठी परवाना किंवा पियूसीची गरज नाही

मॅन्टिस बाईक चालवण्यासाठी परवाना, पीयूसीची गरज नाही. यामध्ये 250 वॅटचे मोटर आणि कंट्रोलर दिले आहे. ग्रीनवोल्टने मॅन्टिसला इन-हाऊस डिझाईन आणि डेवलप केले आहे. यामध्ये दिलेली लिथिअम-आयन बॅटरी रिमूवेबल आहे. ही बॅटर काढून चार्जिगंही करु शकता येते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI