लग्नात नवरदेवाचा जोरदार डान्स, काही तासांनी मृत्यू

लग्नात बराच वेळ डान्स केल्याने नवरदेवाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही घटना तेलंगणामधील निजामाबाद येथे (Groom death due to dance) घडली.

लग्नात नवरदेवाचा जोरदार डान्स, काही तासांनी मृत्यू
सचिन पाटील

| Edited By:

Feb 15, 2020 | 10:54 PM

हैद्राबाद : लग्नात बराच वेळ डान्स केल्याने नवरदेवाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही घटना तेलंगणामधील निजामाबाद येथे (Groom death due to dance) घडली. गणेश असं 25 वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे नवरदेवाच्या घरात शोकाकुल वातावरण आहे.

निजामाबादमधील बोधन शहरात आज (15 फेब्रुवारी) गणेशचा विवाहसोहळा (Groom death due to dance) होता. यानंतर लग्नाची वरात निघाली. यावेळी मृत गणेश आणि त्याच्या पत्नीनेही वरातीमध्ये जोरदार डान्स केला. लग्न झाल्याच्या आनंदात गणेश त्याच्या मित्र परिवारासोबत बराच वेळ डान्स करत होता.

डान्स करत असताना अचानक त्याला हृदय विकाराचा झटका आला. यावेळी कुटुंबियांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच गणेशचा मृत्यू झाला. हृदय विकाराच्या झटक्याने गणेशचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

डीजेच्या जोरदार आवाजामुळे गणेशला त्रास होत होता, असं त्याच्या कुटुंबियांनी सांगितले.

दरम्यान, गणेश एका खासगी कंपनीत काम करत होता. सात दिवसांपूर्वी तो त्याच्या गावी आला होता. गणेशच्या मृत्यूने बोधन शहरात शोककळा पसरली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें