राधाकृष्ण विखे पाटील नाईलाजास्तव भाजपमध्ये, लवकरच ते महाविकास आघाडीत येणार : हसन मुश्रीफ

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील महाविकास आघाडीत सहभागी होतील, असा गौप्यस्फोट ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीम (Minister Hasan Mushrif) यांनी केला आहे.

राधाकृष्ण विखे पाटील नाईलाजास्तव भाजपमध्ये, लवकरच ते महाविकास आघाडीत येणार : हसन मुश्रीफ
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 8:03 PM

अहमदनगर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील महाविकास आघाडीत सहभागी होतील, असा दावा ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीम (Minister Hasan Mushrif) यांनी केला. अहमदनगर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“काँग्रेसमधून भाजपात गेलेले विखे पाटील हेसुद्धा महाविकास आघाडीत परत येतील. ते काँग्रेस विचारांचे आहेत. विखे पाटील नाईलाजाने तिकडे गेले आहेत”, असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला.

यावेळी त्यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. “देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना आपली सत्ता जाईल असं वाटलं नव्हतं. मात्र, त्यांना महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यामुळे अचानक झटका बसला आहे. त्यामुळे ते दिवस-रात्र टीका करत आहेत”, अशी टीका हसन मुश्रीफ (Minister Hasan Mushrif) यांनी केली.

“जोपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मनात आहे तोपर्यंत सरकार चालेल आणि ते 15 वर्ष चालेल. किमान समान कार्यक्रमावर हे सरकार चालेल”, असे हसन मुश्रीफ म्हणाले.

दरम्यान, सरपंच निवडणुकीबाबत ठाकरे सरकार एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या विचारात आहे. सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून न होता ग्रामपंचायत सदस्यांकडून व्हावी, असा प्रस्ताव महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठवला होता. मात्र, राज्यपालांनी हा प्रस्ताव परत पाठवत विधिमंडळात याबाबत चर्चा होऊन तसा कायदाच बनवावा, अशी सूचना दिली, असं हसन मुश्रीम यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.