राजेश टोपेंची बैलगाडीतून पाहणी, जालन्यातील नुकसानग्रस्त भागाचा आढावा

जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी बैलगाडीतून नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा सुरू केला आहे.

राजेश टोपेंची बैलगाडीतून पाहणी, जालन्यातील नुकसानग्रस्त भागाचा आढावा

जालना : राज्याचे आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी बैलगाडीतून नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा सुरू केला आहे. पालकमंत्री टोपे यांनी मंठा तालुक्यातील मौजे हातवन परिसरात अतिवृष्टी व निमन दुधना नदीच्या पाण्यामुळे बाधित झालेल्या शेती पिकांची पाहणी केली आहे. यावेळी टोपे यांच्यासह आमदार राजेश राठोड, शिवसेनेचे जिल्हाअध्यक्ष ए.जी. बोराडे, पंकजनाना बोराडे, कपिल आकात यांच्यासह अधिकारी व शेतकऱ्यांची उपस्थिती होती. (Health Minister Rajesh Tope inspects damaged crops while riding bullock cart in Jalna)

टोपे यांनी काल (शनिवारी) अंबड तालुक्यातील भांबेरी, दह्याळा, बळेगाव, आपेगाव, नालेवाडी येथील शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांनीदेखील यावेळी त्यांच्या मागण्या पालकमंत्र्यांपुढे मांडल्या. राज्य सरकार शेतकऱ्यांप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन काम करत असून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला.

आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच जिल्हा व मराठवाड्यातील कोरोनाच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली. टोपे म्हणाले की, करोनाग्रस्त रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे आपण अनलॉक करतोय. लोकांनी अधिक काळजी घेतली तर ही संख्या अजून कमी होईल.

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, लोकांनी भौतिक अंतर नियम कठोरपणे पाळले पाहिजेत, मास्कचा नीट वापर केला पाहिजे. ट्रिटमेंट प्रोटोकॉल बऱ्याच अंशी सुधारल्यामुळे कोरोनाग्रस्तांचा मृत्यूदरदेखील कमी होतानाचे चित्र दिसत आहे. मराठवाड्यातही हा दर कमी होताना दिसत असला तरी आपल्याला टार्गेट रेट एक टक्क्यापेक्षा कमी करायचा आहे. एकूण टेस्टिंग केलेल्यांपैकी दहा टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आढळतात हा पॉझिटिव्हिटी टारगेट रेट आहे.

अनलॉकच्या प्रक्रियेबद्दल बोलताना टोपे म्हणाले की, मुंबईत लोकलच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. रेस्टॉरंट्स उघडले आहेत. आपण कितीही ठरवले तरी गर्दीमुळे नियमांचे पालन होत नाही. तरीदेखील आपल्याला हे कटाक्षाने करावेच लागेल, कारण आपला जीव महत्त्वाचा आहे. मुंबईत कोरोना वाढणार नाही, याची मला खात्री आहे

संबंधित बातम्या 

Parbhani | परभणीत कलेक्टरकडून बैलगाडीतून ओल्या दुष्काळाची नुकसानीची पाहणी

Dada Bhuse | मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान – कृषीमंत्री दादा भुसे

नुकसानीचे पंचनामे होत आहेत का?, देवेंद्र फडणवीस यांचा सवाल, मुख्यमंत्र्यांना पत्र

(Health Minister Rajesh Tope inspects damaged crops while riding bullock cart in Jalna)

Published On - 3:00 pm, Sun, 4 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI