राज्यसभेत विरोधकांची मोदी सरकारच्या धोरणांवर टीका, राजेश टोपे म्हणतात…

कोरोना विषाणूची साखळी मोडण्यासाठी लॉकडाऊन ही आवश्यक बाब आहे, असं सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले (Rajesh Tope on Lockdown).

राज्यसभेत विरोधकांची मोदी सरकारच्या धोरणांवर टीका, राजेश टोपे म्हणतात...

जालना : कोरोना विषाणूची साखळी मोडण्यासाठी लॉकडाऊन ही आवश्यक बाब आहे, असं सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले (Rajesh Tope on Lockdown). काल (16 सप्टेंबर) राज्यसभेत विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली होती. यावर आता राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली (Rajesh Tope on Lockdown).

“लॉकडाऊन एका चांगल्या हेतून केला जोता. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून वाचण्यासाठी त्याची साखळी मोडणे ही आवश्यक बाब आहे. कोरोना विरुद्ध लढाईसाठी जी तयारी करावी लागते त्यात डॉक्टर, हॉस्पीटलची उभारणी, औषधं, उपकरणे याची जमवाजमव करावी लागते. हा एक “ब्रीदिंग टाईमिंग” आहे”, असं राजेश टोपे यांनी सांगितले.

“महाराष्ट्र राज्य सरकारच्यावतीने लॉकडाऊन ठेवण्यात आला होता. मात्र त्याचा आर्थिक फटका सरकारच्या तिजोरीवर बसतो. तसेच सामान्य माणसाचा आर्थिक स्त्रोत बंद होतो. त्यामुळे तो अडचणीत यतो. या सगळ्या समस्येवर स्वयंशिस्त अतिशय महत्वाची आहे आणि शिस्तीतूनच मार्ग काढावा लागेल”, असंही टोपेंनी सांगितले.

दरम्यान, काल राज्यसभेत कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी देशात लॉकडाऊन केला. मात्र त्याने काय साध्य झाले, उलट कोणतेही नियोजन न करता लॉकडाऊन केल्याने देशाची अर्थव्यवस्थेची वाट लागली. देशावरील आर्थिक संकट वाढले. त्यामुळे विरोधकांनी मोधी सरकारच्या धोरणावर हल्लाबोल चढवला.

संबंधित बातम्या :

Rajesh Tope | राज्यात स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना लागू : राजेश टोपे

Rajesh Tope | अनलॉक केल्यानं कोरोना रुग्ण वाढले, मास्क नसेल तर 500 रुपये दंड : राजेश टोपे

Published On - 4:01 pm, Thu, 17 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI