50 कोटींच्या हेरोईनसह नायजेरिअन अटक, दिल्ली पोलिसांची कारवाई

50 कोटींच्या हेरोईनसह नायजेरिअन अटक, दिल्ली पोलिसांची कारवाई

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने 12 किलो हिरोईन जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या हेरोईनची किंमत जवळपास 50 कोटी (Fifty Crore Heroin seized Delhi) रुपये असेल, असं सांगितलं जात आहे.

सचिन पाटील

| Edited By:

Dec 18, 2019 | 7:57 AM

दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने 12 किलो हिरोईन जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या हेरोईनची किंमत जवळपास 50 कोटी (Fifty Crore Heroin seized Delhi) रुपये असेल, असं सांगितलं जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकूण तीन लोकांना अटक केली असून यामध्ये एका नायझेरिअन व्यक्तीचा समावेश आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रमोदकुमार सिंह कुशवाहा (Fifty Crore Heroin seized Delhi) यांनी काल (17 डिसेंबर) दिली.

पोलिसांनी अंमली पदार्थासह अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अनुभव दुशाद उर्फ विक्की (35) दिल्लीमधील मुनिरका गाव येथे राहणार आहे. रेणुका (27) भोपाळ येथे राहणारी आहे आणि क्रिस्ट जोले (28) हा नायजेरियन येथे राहणारा आहे. जोले गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटक विजावर भारतात आला होता. पण त्यानंतर तो भारतात लपून राहत होता.

“अनुभवकडे सात किलो, रेणुकाकडे तीन किलो आणि जोलेकडून दोन किलो हाय क्वॉलिटी हेरोइन जप्त करण्यात आले आहे. अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या या आंतरराष्ट्रीय टोळीचा भांडाफोड दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने केला आहे. ही टोळी राजधानी दिल्लीसह अनेक राज्यात हेरोइनसारख्या घातक पदार्थांची तस्करी करत होती. त्यासोबतच काही देशातही तस्करी केली जात होती”, असं उपायुक्त प्रमोदकुमार सिंह कुशवाह यांनी सांगितले.

विशेष पथकाकडून अंमली पदार्थांच्या टोळीवर कारवाई

या टोळीला पकडण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून पोली निरीक्षक ईश्वर सिंह यांची टीम काम करत होती. 14 डिसेंबर 2019 रोजी पोलिसांच्या विशेष पथकाला अनुभव दिल्ली रेल्वे स्टेशनजवळ पोहोचल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे विशेष पथकाने रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून अनुभव आणि रेणुकाला अटक केली, अशी माहिती उपायुक्त कुशवाहा यांनी दिली.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें