विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परीक्षांचे वेळापत्रक दोन दिवसात जाहीर होणार : उदय सामंत

विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परीक्षेचे वेळापत्रक दोन दिवसात जाहीर करण्यात येईल. एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असं शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परीक्षांचे वेळापत्रक दोन दिवसात जाहीर होणार : उदय सामंत
Follow us
| Updated on: May 05, 2020 | 5:41 PM

मुंबई : विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परीक्षेचे वेळापत्रक (University College And CET Exams) दोन दिवसात जाहीर होणार, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी दिली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परीक्षेचे वेळापत्रक दोन दिवसात जाहीर करण्यात येईल. एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असंही शिक्षण मंत्री उदय सामंतयांनी सांगितले (University College And CET Exams). त्यामुळे विद्यार्थ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.

राज्यातील सर्व कुलगुरुंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे परीक्षेसंदर्भात नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या समितीचा अहवाल लवकरच राज्य शासनाला सादर केला जाईल, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेण्यात येईल, असं उदय सामंत यांनी सांगितले.

पदवी आणि पदवीत्तर शेवटच्या वर्षाच्या परीक्षा 1 जुलै ते 15 जुलै, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा CET 20 ते 30 जुलैदरम्यान घेण्यात येतील का? आणि या परीक्षांचा निकाल 15 ऑगस्टपर्यंत जाहीर करुन 1 सप्टेंबरपासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात येईल का? तसेच, लॉकडाऊनचा कालावधी विद्यार्थ्यांसाठी मानवी हजार दिवस (Deemed To be Attended) म्हणून ग्राह्य धरण्यात यावा. कॅरी फॉरवर्ड योजना लागू करुन पुढील वर्गात प्रवेश देण्यात येईल आणि शेवटच्या वर्षाची परीक्षा घेण्यात यावे एम.फिल आणि पीएचडीचा मौखिकी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या (University College And CET Exams) माध्यमातून घेण्यात येऊन या विद्यार्थ्यांचा लघुशोधप्रबंध आणि प्रबंध सादर करावयाची मुदत निघून गेली असल्यास त्यांना मुदतवाढ देण्यात येईल का? यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. परंतु राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही सामंत यांनी संगितले.

विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये समुपदेशन केंद्राची निर्मिती

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये एक आणि मोठ्या जिल्ह्यांमध्ये दोन समुपदेशन केंद्राची निर्मिती करण्यात यावी. समुपदेशन केंद्राच्या मदतीने संबंधित जिल्ह्यातील पालक आणि विद्यार्थ्यांच्या सर्व अडचणींचे समाधान करण्यात येईल, अशा सूचना उदय सामंत यांनी यावेळी दिल्या.

सीईटी परीक्षेसंदर्भात समिती गठीत

बारावीनंतर अभियांत्रिकी आणि इतर अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET) घेण्याबाबत महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. बारावी नंतर आणि पदव्युत्तरसाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेचे नियोजन संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या समितीने सर्व उपाययोजना करुन आपले वेळापत्रक तयार करावे, अशा सूचना उदय सामंत (University College And CET Exams) यांनी केल्या.

संबंधित बातम्या :

Malegaon Corona Update | मालेगावला कोरोनाचा विळखा, पाच दिवसात 152 रुग्णांची वाढ

कोरोनाबाधित रुग्णांच्या वॉर्डमध्ये रोबो औषधं पुरवणार, सोलापूर रेल्वे विभागाचा अनोखा प्रयोग

अकोल्यात एकाच दिवसात कोरोनाचे 11 नवे रुग्ण, बाधितांची संख्या 75 वर

हिंगोलीत ‘कोरोना’ रुग्णसंख्येचा स्फोट, 24 तासात 37 SRPF जवानांना लागण, रुग्णसंख्या 90 वर

Non Stop LIVE Update
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.