टॅट्टू गोंदवण्यासाठी हॉलीवुड अभिनेता मुंबईत

टॅट्टू गोंदवण्यासाठी हॉलीवुड अभिनेता मुंबईत

मुंबई : हॉलीवुड अभिनेता लॉरी कॅलवर्ट टॅट्टू गोंदवण्यासाठी चक्क न्युयॉर्कवरुन मुंबईत आला आहे. मालाड येथील एलीयन टॅट्टू येथे सेलिब्रिटी टॅट्टू आर्टीस्ट सनी भानुशाली याने या अभिनेत्याच्या संपुर्ण डाव्या हातावर टॅट्टू गोंदवला आहे. आपल्या टॅट्टू प्रेमाविषयी बोलताना लॉरी म्हणाला की, सनी भानुशाली सारख्या टॅट्टू आर्टीस्टकडून टॅट्टू गोंदविण्यासाठी मी एवढ्या दूर प्रवास करून आलो आहे. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने डाव्या […]

Nupur Chilkulwar

|

Jul 05, 2019 | 4:47 PM

मुंबई : हॉलीवुड अभिनेता लॉरी कॅलवर्ट टॅट्टू गोंदवण्यासाठी चक्क न्युयॉर्कवरुन मुंबईत आला आहे. मालाड येथील एलीयन टॅट्टू येथे सेलिब्रिटी टॅट्टू आर्टीस्ट सनी भानुशाली याने या अभिनेत्याच्या संपुर्ण डाव्या हातावर टॅट्टू गोंदवला आहे.

आपल्या टॅट्टू प्रेमाविषयी बोलताना लॉरी म्हणाला की, सनी भानुशाली सारख्या टॅट्टू आर्टीस्टकडून टॅट्टू गोंदविण्यासाठी मी एवढ्या दूर प्रवास करून आलो आहे. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने डाव्या हातावर 9 गुलाबाची फुले गोंदवली. मी मालाड मधील एलियन टॅट्टू येथे माझ्या टॅट्टूची हौस पुर्ण केली. यापुढेही मी माझ्या शरीरावर टॅट्टू गोंदवणार असून ते देखील मुंबईमध्येच करणार असल्याचेही लॉरीने सांगितले.

माझ्या संकल्पनेवर काम करण्याचे पुर्ण स्वातंत्र्य मला याठिकाणी देण्यात आले. त्यामुळे हे काम मी आणखी उत्साहाने करु शकलो. फुल स्लीव्ह्ज टॅट्टू या संकल्पनेतून करड्या रंगात नऊ गुलाबाची फुले गोंदवण्यात आली असून हे काम डाव्या हातावर करण्यात आल्याचे सेलिब्रिटी टॅट्टू आर्टीस्ट सनी भानुशाली याने सांगितले.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें