ओटावा (कॅनडा) : कॅनडीयन अभिनेत्री आणि मॉडल स्टेफनी शर्क (45) यांनी आत्महत्या केली आहे. स्टेफनीचे पती आणि अभिनेता डेमियन बिचिर यांनी इन्स्टाग्रामवर याबाबत माहिती दिली. शर्क यांच्या शवविच्छेदन अहवालानुसार, तिचा मृत्यू पाण्यात बुडणे, ऑक्सिजनची कमतरता आणि श्वास कोंडल्याने झाला आहे. दरम्यान शर्कच्या आत्महत्येमुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. EONLINE.COM या वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले […]
Follow us
ओटावा (कॅनडा) : कॅनडीयन अभिनेत्री आणि मॉडल स्टेफनी शर्क (45) यांनी आत्महत्या केली आहे. स्टेफनीचे पती आणि अभिनेता डेमियन बिचिर यांनी इन्स्टाग्रामवर याबाबत माहिती दिली. शर्क यांच्या शवविच्छेदन अहवालानुसार, तिचा मृत्यू पाण्यात बुडणे, ऑक्सिजनची कमतरता आणि श्वास कोंडल्याने झाला आहे. दरम्यान शर्कच्या आत्महत्येमुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. EONLINE.COM या वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
A post shared by DEMIAN BICHIR (@demianbichiroficial) on
“माझ्या प्रिय मित्रांनो, शर्क आणि बिचिर परिवारातील सदस्यांसाठी एक दुखद बातमी आहे. 20 एप्रिलला माझी पत्नी आणि तुमच्या सर्वांची लाडकी अभिनेत्री स्टेफनी शर्क हिचे निधन झाले. शर्कचे अचानक निधन होणे ही आमच्यासाठी दुःखद आणि धक्कादायक बाब आहे. तिच्या अचानक जाण्याने येणारा काळ आमच्यासाठी फार कठीण जाणार आहे. स्टेफनीचे बोलणे खूप सुंदर होते. स्टेफनी ही सदैव आपल्या मनात राहिल. तिच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!”, अशी पोस्ट स्टेफनीचे पती अभिनेता डेमियन बिचिर यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे.
A post shared by DEMIAN BICHIR (@demianbichiroficial) on
स्टेफनी शर्क आणि डेमियन बिचिर यांनी त्यांच्या नात्याची सुरुवात 2010 मध्ये केली होती. त्यानंतर 2016 मध्ये ‘अन कुएन्टो डी सिरको एंड ए लव साँग’ या गाण्यात त्यांनी एकत्र काम केले. या गाण्याचे लिखाण आणि दिग्दर्शन दोन्ही बिचिर यांनी केले आहे. त्याशिवाय 2018 मध्ये ‘द नन’ या चित्रपटाच्या प्रिमियर शोमध्ये ते दोघेही एकत्र दिसले होते.