‘गली बॉय’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, तीन दिवसात किती कमाई?

मुंबई : अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा गली बॉय चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. जोया अख्तर हिने या चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे. देशात एकूण 3350 स्क्रीनवर गली बॉय चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या दोन दिवसात 32 कोटी 50 लाख रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाने गुरुवारी 19 कोटी […]

‘गली बॉय’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, तीन दिवसात किती कमाई?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:26 PM

मुंबई : अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा गली बॉय चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. जोया अख्तर हिने या चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे. देशात एकूण 3350 स्क्रीनवर गली बॉय चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.

चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या दोन दिवसात 32 कोटी 50 लाख रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाने गुरुवारी 19 कोटी 40 लाख रुपयांचा गल्ला जमवला आणि शुक्रवारी 13 कोटी 10 लाख रुपयांची कमाई केली होती. शनिवारी या चित्रपटाने 17 कोटी 50 लाखांची कमाई केली आहे. या चित्रपटाने मेट्रो सिटीसारख्या शहरात जास्त कमाई केली आहे.

गली बॉयची कमाई

  • गुरुवार – 19 कोटी 40 लाख
  • शुक्रवार – 13 कोटी 10 लाख
  • शनिवार – 17 कोटी 50

ग्रॅमी अवॉर्ड विनर रॅप आर्टिस्ट विल स्मिथने चित्रपट पाहिला आणि यामधील रणवीर सिंहच्या अभिनयाचे त्याने कौतुक केले. या चित्रपटात रणवीर एका रॅपरच्या भूमिकेत आहे. विल स्मिथने रणवीरला शुभेच्छा देत म्हटलं की, “यो रणवीर, कॉन्ग्रॅट्स मॅन. गली बॉयमधील तुझे काम मला आवडले”.

अभिनेता रणवीर सिंहचा चित्रपट पद्मावत आणि सिंबाने बॉक्स ऑफिसवर शानदार कमाई केली आहे आणि आता गली बॉयही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. ट्रेड विशेष तज्ञांच्या मते, हा चित्रपट 100 कोटींचा आकडा गाठू शकते.

व्हिडीओ : लोकलमधून उतरताना तरुणाचा तोल गेला, आरपीएफ जवानाने वाचवले प्राण

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.