‘ठाकरे’ची कालपर्यंत 16 कोटींची कमाई, आज किती?

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ‘ठाकरे’ सिनेमाने रविवारी म्हणजे सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी तब्बल 6 कोटी 90 लाख रुपयांची कमाई केली. त्यामुळे ‘ठाकरे’ सिनेमाच्या आतापर्यंतच्या कमाईने 22 कोटी 90 लाखांचा टप्पा पार केला आहे. वाचा – हिंदी की मराठी? ठाकरे सिनेमा कोणत्या भाषेतला पाहाल? ‘ठाकरे’ सिनेमा 25 तारखेला प्रदर्शित झाला. […]

'ठाकरे'ची कालपर्यंत 16 कोटींची कमाई, आज किती?
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:32 PM

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ‘ठाकरे’ सिनेमाने रविवारी म्हणजे सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी तब्बल 6 कोटी 90 लाख रुपयांची कमाई केली. त्यामुळे ‘ठाकरे’ सिनेमाच्या आतापर्यंतच्या कमाईने 22 कोटी 90 लाखांचा टप्पा पार केला आहे.

वाचा – हिंदी की मराठी? ठाकरे सिनेमा कोणत्या भाषेतला पाहाल?

‘ठाकरे’ सिनेमा 25 तारखेला प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या दिवशी 6 कोटी रुपये, 26 जानेवारीला 10 कोटी आणि काल म्हणजे 27 तारखेला 6.90 कोटींची कमाई या सिनेमाने केले. त्यामुळे आतापर्यंत एकूण 22.90 कोटी रुपयांची कमाई ठाकरे सिनेमाने केली आहे. विशेष म्हणजे, मराठीसह हिंदी भाषेतील व्हर्जनही तुफान हिट होताना दिसतो आहे.

वाचा – ‘ठाकरे’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, दोन दिवसात किती कमाई?

शिवसेना स्थापन होण्याचे आधीचे काही वर्षे, शिवसेनेची स्थापना आणि त्यानंतरचे काही वर्षे असा सुरुवातीचा पट या सिनेमातून मांडला गेला आहे. बाळासाहेबांनी मराठी माणसांनी 60-70 च्या दशकात उठवलेला आवाज, पुढे हिंदुत्त्वाची धरलेली कास, दरम्यानच्या काळातली महत्त्वाची आंदोलने इत्यादी गोष्टी या सिनेमात आहेत.

ठाकरे सिनेमा आणि वाद-चर्चा वगैरे

  1. ठाकरे सिनेमावरुन पहिली काहीशी नकारात्मक चर्चा सुरु झाली ती सिनेमात बाळासाहेबांसाठी वापरण्यात आलेल्या आवाजावरुन. अभिनेते सचिन खेडेकर यांच्या आवाजावर अनेकांनी सोशल मीडिया किंवा प्रत्यक्षातही नापसंती दर्शवली होती.
  2. संभाजी ब्रिगेड या संघटनेने ठाकरे सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध केला होता. छत्रपती संभाजी महाराज यांची सिनेमात बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला होता.
  3. ठाकरे सिनेमातील ‘हटाव लुंगी’ या शब्दांवरुन सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला होता. या शब्दांमुळे दक्षिण भारतीयांच्या भावना दुखावतील, असे मत सेन्सॉर बोर्डाने मांडला. त्यानंतर ‘उठाव लुंग’ असे बदल या शब्दांमध्ये सिनेमात करण्यात आले.
  4. ठाकरे सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगदरम्यान दिग्दर्शक अभिजीत पानसे यांच्या अर्ध्यातून निघून जाण्यावरुन नाराजीनाट्य पाहावयास मिळाले. त्यावरुन 23 आणि 24 जानेवारीला उलट-सुलट प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. मात्र, गर्दी असल्याने आपण माघारी गेलो, असे समजुतीचे स्पष्टीकरण अभिजीत पानसे यांनी दिले आणि वाद मिटला.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें