पहिल्याच दिवशी कलंक चित्रपटाची कमाई तब्बल…

पहिल्याच दिवशी कलंक चित्रपटाची कमाई तब्बल...

मुंबई : अभिषेक वर्मन यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘कलंक’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. महावीर जयंतीच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. यावेळी ‘कलंक’ला मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला. या वर्षातील सर्व चित्रपटापेक्षा सर्वात शानदार ओपनिंग कलंक चित्रपटाने केली आहे, असं चित्रपट समीक्षक म्हणाले, कलंक चित्रपटात बॉलिवडूमधील अनेक दिग्गज चेहरे काम करताना दिसत आहेत. कलंक चित्रपटाने पहिल्याच दिवशी 21 कोटी रुपयांची कमाई केली.

कलंकमध्ये अभिनेता वरुण धवन, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त, माधुरी दीक्षित सारखे मोठे कलाकार काम करत आहेत. हा चित्रपट पुढेही आणखी चांगली कमाई करेल, असं तज्ञांकडून म्हटलं जात आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनमधून हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. कलंक एक ड्रामा चित्रपट आहे.

यावर्षी प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांमध्ये कलंक चित्रपटाची ओपनिंग सर्वात हटके अशी झाली. कलंकने पहिल्याच दिवशी 21.60 कोटी रुपयांची कमाई केली. यावर्षी आतापर्यंत हिट समजल्या जाणाऱ्या केसरी चित्रपटाची कमाई 21.06 कोटी रुपये होते. तर गली बॉय 19.40 कोटी रुपयांची कमाई केली, तर टोटल धमाल चित्रपटाने 16.50 कोटी रुपयांची कमाई केली.


या चित्रपटात 20 वर्षानंतर संजय दत्त तसेच माधुरी दीक्षित यांची जोडी पाहायला मिळाली आहे. यामुळे संजय आणि माधुरीच्या चाहत्यामधेही या जोडीबद्दल चर्चा सुरु आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI