गर्भवती महिलांनी काय खावं? कसं वागावं? कोणते कपडे घालावेत? लखनौ विद्यापीठाचा नवा कोर्स

गर्भवती महिलांची काळजी कशी घ्यावी? याबाबत उत्तर प्रदेशचं लखनौ विद्यापीठ 'गर्भसंस्कारा'चा नवा कोर्स सुरु करत आहे. (Lucknow University Conducting Garbha Sanskar course).

गर्भवती महिलांनी काय खावं? कसं वागावं? कोणते कपडे घालावेत? लखनौ विद्यापीठाचा नवा कोर्स

लखनौ : गर्भवती महिलांची काळजी कशी घ्यावी? याबाबत उत्तर प्रदेशचं लखनौ विद्यापीठ ‘गर्भसंस्कारा’चा नवा कोर्स सुरु करत आहे. या कोर्समध्ये गर्भवती महिलांनी कसं वागावं, काय खावं, कोणते कपडे परिधान करावेत, कोणती गाणी ऐकावीत आणि कोणते योगासने करुन फिट राहवं याबाबत शिक्षण दिलं जाणार आहे (Lucknow University Conducting Garbha Sanskar course).

लखनौ विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ वूमेन स्टडीज विभागात हा कोर्स सुरु करण्यात येत आहे. हा कोर्स फक्त मुलींसाठी नसून मुलंदेखील या कोर्समार्फत शिक्षण घेऊ शकणार आहेत.

“उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी मुलींना गर्भसंस्काराचं प्रशिक्षण देण्यात यावं असा प्रस्ताव प्रशासनापुढे मांडला होता. या प्रस्तावानंतर हा कोर्स सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे गर्भसंस्कारावर शिक्षण देणारं उत्तर प्रदेश हे पहिलं राज्य ठरणार आहे”, असं लखनौ विद्यापीठाचे प्रवक्ता दुर्गेश श्रीवास्तव म्हणाले.

दरम्यान, या कोर्सचा संपूर्ण आराखडा तयार करण्यात आला आहे. या कोर्समध्ये विशेषत: कुटुंब नियोजन आणि गर्भवती महिलांच्या पोषक आहारावर भर देणार असल्याची माहिती श्रीवास्तव यांनी दिली.

(Lucknow University Conducting Garbha Sanskar course)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI