भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक, पती-पत्नीचा जागीच मृत्यू

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून क्षणात जोडप्याचे प्राण गेल्यामुळे शोककळा पसरली आहे.

भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक, पती-पत्नीचा जागीच मृत्यू

नाशिक : नाशिकमधून एका भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. नाशिकच्या जेलरोड परिसरात काल सायंकाळच्या सुमारास ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून क्षणात जोडप्याचे प्राण गेल्यामुळे शोककळा पसरली आहे. (husband wife killed in truck and two wheeler accident in nashik)

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील जोडप्याचा जागीच मृत्यू झाला आहे. चंद्रभान जाधव आणि पत्नी मनीषा जाधव अशी मृत दांपत्यांची नावं आहेत. आपल्या दुचाकीवर प्रवास करत असतानाच ट्रकने धडक दिल्याने ते जागीच ट्रक खाली चिरडले गेले. शरीरावरून संपूर्ण ट्रक गेल्याने दोघांचाही मृत्यू झाला.

विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीने मला एबी फॉर्म दिला होता; एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा

खरंतर, जेलरोड परिसरात अवजड वाहनांना बंदी असतानाही काही वाहन सर्रासपणे त्या ठिकाणाहून ये-जा करतात. मात्र, याकडे पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष दिसून येतं आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी अवजड वाहनांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे असे जीवघेणे अपघात झाल्यानंतर आतातरी कारवाई व्हावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

दरम्यान, भर रस्त्यात अपघात झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमा झाली होती. स्थानिकांनी तात्काळ अपघाताची माहिती पोलिसांना देऊन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रभान आणि मनीषा यांचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेनदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत तर घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

फक्त 5 हजारांमध्ये सुरू करा व्यवसाय, प्रत्येक महिन्याला कमवाल बक्कळ पैसा

(husband wife killed in truck and two wheeler accident in nashik)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI