मी व्हाईट हाऊसमध्ये एकटा पडलोय : डोनाल्ड ट्रम्प

मी व्हाईट हाऊसमध्ये एकटा पडलोय : डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन : अमेरिकेत डेमोक्रॅट्स (खासदार) आणि रिपब्लिकनमध्ये संघर्ष सुरु आहे. व्हाईट हाऊसमध्ये आपण एकटे पडलो असल्याचं ट्वीट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. फ्लोरिडाला रिसॉर्टवर जाण्याचा प्लॅन ट्रम्प यांनी रद्द केला आणि आपण एकटे असल्याचं त्यांनी सांगितलं. रखडलेलं सरकारी कामकाज पूर्ण करण्यासाठी ते डेमोक्रॅट्सची वाट पाहत होते. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला व्हाईट हाऊसमध्ये एकाकी पडलेल्या ट्रम्प […]

सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:47 PM

वॉशिंग्टन : अमेरिकेत डेमोक्रॅट्स (खासदार) आणि रिपब्लिकनमध्ये संघर्ष सुरु आहे. व्हाईट हाऊसमध्ये आपण एकटे पडलो असल्याचं ट्वीट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. फ्लोरिडाला रिसॉर्टवर जाण्याचा प्लॅन ट्रम्प यांनी रद्द केला आणि आपण एकटे असल्याचं त्यांनी सांगितलं. रखडलेलं सरकारी कामकाज पूर्ण करण्यासाठी ते डेमोक्रॅट्सची वाट पाहत होते.

ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला व्हाईट हाऊसमध्ये एकाकी पडलेल्या ट्रम्प यांनी संपूर्ण दिवस विरोधकांवर टीका करण्यात घालवला. सरकारी कामकाज ठप्प पडून जवळपास तीन दिवस उलटले आहेत. अमेरिका-मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी आर्थिक समस्या उद्भवल्यानंतर ट्रम्प आणि डेमोक्रॅट्समध्ये वाद सुरु झाला.

डोनाल्ड ट्रम्प देशात अराजकता निर्माण करत असल्याचा आरोप अमेरिकन काँग्रेस सदस्यांनी केला आहे. सरकारी कामकाज ठप्प झाल्यामुळे 25 टक्के सरकारी संस्था विना निधीच्या सुरु असल्याचं डेमोक्रॅट्सचं म्हणणं आहे.

ख्रिसमसच्या पूर्वसंध्येलाच राष्ट्राध्यक्ष देशाला अराजकतेमध्ये ढकलत असल्याचा आरोप सिनेट (अमेरिकेतील वरचं सभागृह) सदस्यांनी केलाय. एकीकडे शेअर बाजार बुडला आहे, तर दुसरीकडे राष्ट्राध्यक्ष आरक्षित निधी खर्च करण्याची गोष्ट करत आहेत, असं या सदस्यांचं म्हणणं आहे.

स्थानिक वृत्तांनुसार, केंद्रीय बँकेचे (उदाहरणार्थ भारतात रिझर्व्ह बँक) अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्याजदरांमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे नाराज झालेले ट्रम्प अध्यक्षांची उचलबांगडी करण्याच्या तयारीत आहेत. पण अर्थमंत्र्यांच्या मते असा कोणताही विचार सुरु नाही.

शुक्रवारी हा सर्व संघर्ष सुरु झाला. तेव्हापासून अमेरिकेतील जवळपास 25 टक्के कामकाज ठप्प झालंय. काँग्रेसकडून (काँग्रेस म्हणजे खालचं सभागृह, जसं की भारतात लोकसभा) निधीसाठी मंजुरी देण्यात आलेली नाही. त्यामुळे सरकारी संस्थांना निधी पुरवता आलेला नाही.

वादाची सुरुवात झाली ती अमेरिका आणि मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्याच्या निर्णयापासून. या भिंतीसाठी निधी कुठून द्यायचा यावर सहमती न झाल्यामुळे ट्रम्प आणि डेमोक्रॅट्समध्ये मतमतांतर निर्माण झालं, परिणामी संस्थांचा निधी रखडला आहे. निधीवर सहमतीसाठी सिनेटची पुन्हा एकदा बैठक होणार आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें