माफी मागणार नाही, ट्विट हटवण्याचा प्रश्नच येत नाही; कुणाल कामरा भूमिकेवर ठाम!

न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कॉमेडियन कुणाल कामरांविरोधात खटला चालणार आहे. कामरा यांनीही या खटल्याला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. ( 'I don't intend to retract tweet or apologise,' says Kunal Kamra)

माफी मागणार नाही, ट्विट हटवण्याचा प्रश्नच येत नाही; कुणाल कामरा भूमिकेवर ठाम!
Follow us
| Updated on: Nov 13, 2020 | 4:45 PM

नवी दिल्ली: न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कॉमेडियन कुणाल कामरांविरोधात खटला चालणार आहे. कामरा यांनीही या खटल्याला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागणार नाही आणि ट्विटही हटवणार नाही, असं कुणाल कामरा यांनी स्पष्ट केलं आहे. ( ‘I don’t intend to retract tweet or apologise,’ says Kunal Kamra)

‘पीटीआय’ वृत्तसंस्थेला कुणाल कामरा यांनी प्रतिक्रिया दिली असून आपल्या वक्तव्यावर आपण ठाम असल्याचं म्हटलं आहे. मी नुकतेच जे ट्विट केलंय त्याने कोर्टाचा अवमान झाल्याचं बोललं जात आहे. प्राईम टाइमच्या लाऊडस्पीकरच्या बाजूने कोर्टाने जो अंतरिम निर्णय दिला आहे. त्यावर मी ट्विट केलं आहे. माझा दृष्टीकोण बदललेला नाही. दुसऱ्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालाचं मौन टीकेच्या स्वातंत्र्याच्या कक्षे बाहेर राहू शकत नाही. माझं ट्विट हटवण्याचा किंवा माफी मागण्याचा माझा इरादा नाही. ते आपल्यासाठी बोलत आहेत, असं मला वाटत आहे, असं कुणाल कामरा यांनी म्हटलं आहे.

अन्य प्रकरणं सोडून माझ्या अवमाननेच्या याचिकेवर कमीत कमी 20 तास सुनावणी व्हावी, अशी माझी इच्छा आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. जम्मू-काश्मीरची स्वायत्ता रद्द करण्यास देण्यात आलेलं आव्हान, निवडणूक बाँडची वैधता यासारखे अनेक प्रकरण कोर्टासमोर आहेत. असं असताना आता हास्य कलाकारांची प्रकरणं कोर्टात सूचीबद्ध केली जाणार आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, भारताचे अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणूगोपाल यांनी कामराविरोधात न्यायालयाच्या अवमान प्रकरणी खटला चालवण्यास परवानगी दिलीय. इंटेरिअर डिझाईनर अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर केला. या निर्णयावर कुणाल कामराने टीका करत काही ट्विट केले होते. हे ट्विट आक्षेपार्ह आणि न्यायालयाचा अवमान करणारे असल्याचं मत वेणूगोपाल यांनी व्यक्त केलं आहे. या ट्विट्सविरोधातच हा खटला चालणार आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली निर्लज्जपणे सर्वोच्च न्यायालयाचा आणि न्यायाधीशांचा अपमान करु शकतो असं सध्या लोकांना वाटतंय. पण संविधानात अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कायद्याच्या मर्यादा आहेत. सर्वोच्च न्यायालयावरील आणि न्यायाधीशांवरील अन्याय्य आणि निर्लज्ज टीका शिक्षेला कारणीभूत ठरू शकते हा संदेश लोकांना देण्याची वेळ आली आहे, असं मला वाटतं, असं वेणूगोपाल म्हणाले होते.

संबंधित बातम्या:

Kunal Kamra | कॉमेडियन कुणाल कामराविरोधात न्यायलायाच्या अवमान प्रकरणी खटला चालणार, AG कडून परवानगी

‘लाच’ देण्यासाठी कुणाल कामरा राज ठाकरेंच्या घराबाहेर उभा

Kunal Kamra | अर्णवच्या सुटकेनंतर खोचक ट्विट, कुणाल कामरावर अवमानना खटला दाखल करण्याची मागणी

( ‘I don’t intend to retract tweet or apologise,’ says Kunal Kamra)

Non Stop LIVE Update
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?.