दुकानदाराची अनोखी ऑफर, जिओमध्ये नंबर पोर्ट केल्यास दोन किलो साखर, अर्धा किलो चिकन फ्री

आष्टी येथील एका मोबाईल दुकानदाराने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक नवी शक्कल लढवली (if you port number in jio get chicken and sugar free) आहे.

दुकानदाराची अनोखी ऑफर, जिओमध्ये नंबर पोर्ट केल्यास दोन किलो साखर, अर्धा किलो चिकन फ्री


बीड : आष्टी येथील एका मोबाईल दुकानदाराने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक नवी शक्कल लढवली (if you port number in jio get chicken and sugar free) आहे. मोबाईल दुकानदाराने अनोखी ऑफर ग्राहकांना दिलेली आहे. कोणताही मोबाईल कंपनीचा नंबर जिओमध्ये पोर्ट करा आणि त्यावर दोन किलो साखर किंवा अर्धा किलो चिकन मोफत मिळवा. त्यामुळे अनेकजण या दुकानावर गर्दी करत (if you port number in jio get chicken and sugar free) आहेत.

आष्टी शहरातील बीड-आष्टी रोडवर समीर पोकळे यांचं रेणुकाई मोबाईल शॉपचं दुकान आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अशा स्कीम ठेवण्यात येतात. मात्र सध्याची ही स्कीम केवळ आष्टीतच नाही. तर जिल्ह्याभरात चर्चेत आहे. कोणत्याही नेटवर्कचा नंबर जिओमध्ये पोर्ट केला असता ग्राहकाला या स्किमचा लाभ दिला जातोय.

“लोकांना आकर्षित करण्यासाठी नेहमीच आम्ही ग्राहकांना नवनवीन ऑफर देत असतो. ऑफर दिल्यामुळे आम्ही नेहमी चर्चेत राहतो. मोठ्या प्रमाणात ग्राहक आमच्याकडे येतो. यंदाही आम्ही चिकन फ्री देण्याचे ठरवले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्राहक येत आहेत. तसेच ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दररोज किमान दहा किलो चिकन आम्ही देत आहोत”, असं दुकानदार समीर पोकळे यांनी सांगितले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI